Indias First Electric Vehicles City: केवडिया बनणार देशातील पहिले इलेक्ट्रिक वाहन शहर; येथे धावतील केवळ बॅटरीवर चालणाऱ्या कार आणि बसेस
Statue Of Unity from Kevadia Photo credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक शहराचा (Country's First Electric Vehicles City) उल्लेख केला. पीएम मोदी यांनी गुजरातमधील त्या ठिकाणचा उल्लेख केला जिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. ते म्हणाले की गुजरातच्या केवडिया (Kevadia) कॉलनीला ई-शहर म्हणून विकसित केले जाईल. त्याचे कामही वेगाने होत आहे. पीएम मोदी म्हणाले की, आगामी काळात पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन गुजरातमधील केवडिया शहरामध्ये फक्त बॅटरीवर आधारित वाहनांना प्राधान्य दिले जाईल.

केवडिया हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे जेथे अलिकडच्या काळात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या शहराबाबत पीएम मोदी म्हणाले की, आगामी काळात या शहरात फक्त बॅटरीवर आधारित चारचाकी आणि बस धावतील. केवडियातील जंगल सफारीसाठी फिरण्यासाठी आधीपासूनच ई-वाहन वापरण्यात येत आहेत.

पीएम मोदींच्या या घोषणेपूर्वी, सन 2019 मध्ये केंद्र सरकारने केवडियामध्ये केवळ इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. नॅशनल टुरिझम अ‍ॅडव्हायझरी कौन्सिलचे माजी अध्यक्ष आणि माजी पर्यटन मंत्री के जे एल्‍फॉन्‍स यांनी सांगितले होते की, स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल, अशा परिस्थितीत या ठिकाणी जागतिक स्तरावरील पर्यटनाची सुविधा विकसित करणे हे ध्येय आहे. एल्‍फॉन्‍स यांनी केवडिया येथे त्याच वेळी देशातील पहिला इलेक्ट्रिक वाहन पर्यटन उपक्रम देखील सुरू केला होता. स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पर्यावरणपूरक ई-बाईकचे उद्घाटन करण्यात आले होते. (हेही वाचा: Audi लवकरच घेऊन येणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 400km अंतर कापणार)

सध्या केवडियामध्ये BLive मार्फत लोकांना ई-बाईक सेवा दिली जात आहे. देशातील ही पहिली सेवा आहे, ज्याद्वारे स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पर्यटक ई-बाईकचा आनंद घेऊ शकतात. कंपनी 1500 रुपयांमध्ये दोन तासासाठी ई-बाइक ऑफर करते. केवडियामध्ये ई-बाईक व ई-वाहनांच्या ट्रेंडला प्रेरणा युरोपमधून मिळाली आहे.