कॅब जर तुम्हाला चुकीच्या मार्गाने घेऊन जात असल्यास Google Map देणार वॉर्निंग
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: New York Post)

जर तुम्हाला एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचे असो किंवा ओळखीच्या ठिकाणी त्यावेळी आपले वहान नसल्यास कॅबचा आधार घेतो. मात्र कॅबने जाताना काही चाल योग्य मार्गाने घेऊन न जात असल्याने वाद झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. पण आता गुगल मॅपने या गोष्टीवर चाप बसवण्यासाठी एक फिचर रोलआउट केले आहे. त्यानुसार जर कॅब चालकाने तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेल्यास गुगल मॅप तुम्हाला त्याबाबत सुचना देणार आहे. हे फिचर पर्यटकांसाठी फार उपयोगी ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला प्रथम गुगल मॅप डाऊनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर तेथे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या जागेचे नाव लिहावे लागे. असे केल्यानंतर ड्रायव्हिंग आयकॉन दाखवला जाईल तेथे क्लिक केल्यावर Stay Safer चे ऑप्शन दाखवण्यात येईल. गुगल मॅपच्या नव्या फिचरअंतर्गत तुम्हाला Get Off Route Alerts ऑप्शन मिळणार आहे.(सावधान! अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोनच्या तुलनेत iPhone हॅक होण्याचा सर्वाअधिक धोका-रिपोर्ट)

यापूर्वी सुद्धा गुगल मॅपने एक नवे फिचर लॉन्च केले होते. त्यानुसार इलेक्ट्रिक कार सुरु झाल्यानंतर चालकांना EV चार्जर्स शोधता येणार होते. याबाबतची माहिती एका रिपोर्ट मध्ये देण्यात आली होती. त्यामध्ये असे ही सांगण्यात आले होते की, हे नवे फिचर अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसाठी अपडेट करण्यात आले आहे. त्यानुसार कार सपोर्टनुसार स्टेशन्सला फिल्टर करता येणार होते.

गुगल मॅपच्या अजून एका नव्या  फीचरमुळे आता तुम्ही ऍप वरून प्रवासाचा रूट आणि वाहनासोबतच ट्रेनच्या वेळा आणि गर्दीचा सुद्धा अंदाज घेऊ शकणार आहात. त्यामुळं ट्रेन आणि बसमधून दररोज प्रवास करणाऱ्यांचा काही प्रमाणात त्रास कमी होणार आहे. प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे, काहीच जागा रिकामी आहेत, उभं राहण्याची जागा आहे, जागा नाहीये अशा चार पर्यायात उत्तर मिळेल. यांचा अंदाज घेऊन मग प्रवासी आपली यात्रा प्लॅन करू शकता.