खुशखबर! Hyundai ची बंपर सवलत ऑफर; Grand i10 वर 75 हजार, तर i10 NIOS वर मिळवा 55 हजाराची सूट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ठ्ये
Hyundai Grand i10 (Photo Credits: Hyundai)

दक्षिण कोरियाची आघाडीची कार उत्पादक कंपनी ह्युंदाईने  (Hyundai), अलीकडेच बाजारात आपली लोकप्रिय ग्रँड आय 10 एनआयओएस (Grand i10 NIOS) सादर केली. आता कंपनी फेब्रुवारीमध्ये या कारवर बंपर सवलत (Discount Offer) देत आहे. या व्यतिरिक्त कंपनी आपल्या आय 10 बीएस 4 मॉडेलवरही  (i10 BS4) भारी सूट देत आहे. या गाड्यांच्या खरेदीवर तुम्ही 75,000 व 55, 000 रुपयांची बचत करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे कंपनीची ऑफर -

Hyundai Grand i10: ही कार कंपनीच्या लोकप्रिय हॅचबॅक कारपैकी एक आहे, कंपनीने त्यात 1.2 लीटर क्षमतेचे बीएस 4 इंजिन वापरले आहे. ही कार 83PS ची पॉवर आणि 114Nm चा टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन गीअरबॉक्सचा समावेश आहे. या कारमध्ये कंपनीने 7 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, फ्रंट फॉग दिवा, रियर डिफॉगर, हवे तसे वापरी शकाल असेल स्टीयरिंग व्हील सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे.

मायलेज आणि ऑफरः सर्वसाधारणपणे ही कार प्रतिलिटर 19 किलोमीटरपर्यंत मायलेज देते. याची किंमत 5.85 लाख ते 6.51 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारच्या खरेदीवर तुम्ही 75,000 रुपयांची बचत करू शकता. (हेही वाचा: भारतात नुकतेच लॉंंच झालेली MG Hector ने महिन्याभरात दुसऱ्यांदा घेतला पेट; कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही (Video)

Grand i10 Nios: कंपनीने मागील वर्षी ही कार बाजारात बाजारात आणली होती. अतिशय आकर्षक लूक आणि मजबूत इंजिन क्षमतेने सज्ज असलेली ही कार 5 रूपांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये कंपनीने 1.2 लीटर क्षमतेचे बीएस 6 इंजिन वापरले आहे. जी 83PS ची पॉवर आणि 114Nm चा टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन गीअरबॉक्सचा समावेश आहे.

मायलेज आणि ऑफरः अलीकडेच कंपनीने ही कार नवीन टर्बो पेट्रोल इंजिनसह बाजारात देखील बाजारात आणली आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याचे पेट्रोल व्हेरिएंट 20 किमी प्रतिलिटर पर्यंतचे मायलेज आणि डिझेल व्हेरिएंट 26 केपीएल पर्यंतचे मायलेज देते. या कारची किंमत 5.04 लाख ते 8.04 लाख रुपयांदरम्यान आहे. कंपनी या कारच्या खरेदीवर 55,000 रुपयांची सूट देत आहे.

(नोट: लेखात दिली गेलेली सवलती संदर्भातील माहिती, कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार आहे. सूट बद्दल संपूर्ण माहितीसाठी कृपया आपल्या जवळच्या डीलरशी संपर्क साधा.)