Fastag | Photo Credits: Fastag.org

भारतामध्ये मोदी सरकारच्या कॅशलेस सिस्टमला नव्याने चालना देण्यासाठी 1 डिसेंबर पासून ‘वन नेशन वन फास्टॅग’ (One Nation, One Fastag) ही योजना अंमलात आणली जाणार आहे. त्यामुळे आता देशभरात नॅशनल हायवेवरून प्रवास करताना कोणतेही वाहन रोख पैशांच्या स्वरूपात टोल न देता कुठेही प्रवास करू शकणार आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गावर एकूण 527 टोल प्लाझांपैकी 380 टोल प्लाझाच्या सर्व लेन फास्टॅगसह सुसज्ज आहेत. उर्वरित लेन लवकरच फास्टॅगसह सुसज्ज होतील. 1 डिसेंबरपासून देशातील सर्व टोल प्लाझावर अशी व्यवस्था केली जाईल. त्यामुळे तुम्ही अद्याप फास्टटॅग घेतला नसेल तर तुमच्यासाठी आता शेवटचे काही दिवस उपलब्ध आहेत. हा टॅग़ ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात मिळणार आहे. पण तुमच्या घराजवळ टोल प्लाझा नसेल तर ऑनलाईन माध्यमातून हा टॅग मिळणार आहे. मग पहा ऑनलाईन स्वरूपात कसा मिळेल फास्टॅग? 1 डिसेंबर पासून देशात लागू होणार FASTags योजना; टोल नाक्यावर रोख पैसे देण्याची गरज नाही; जाणून घ्या डीटेल्स.

ऑनलाईन माध्यमातून कसा मिळेल फास्टॅग?

  • My FASTag Appच्या माध्यमातून तुम्ही Android आणि iPhone स्मार्टफोनमध्ये थेट फास्टॅग काढू शकता.
  • अनेक बॅंकांनीदेखील नेट बॅंकिंगच्या माध्यमातून हा टॅग काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
  • NPCI.Org.In या अधिकृत वेबसाईटवरही फास्टॅग ऑनलाईन माध्यमातून काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • Amazon आणि PayTM या सारख्या ऑनलाईन साईट्सवरही हे फास्टॅग उपलब्ध आहेत.

फास्टॅग साठी आवश्यक कागदपत्र

  • वाहनाचं नोंदणीचं पत्र
  • वाहनाच्या मालकाचा फोटो
  • केव्हायसीसाठी डॉक्युमेंट्स, वास्तव्याचा दाखला

ऑनलाईन प्रमाणेच ऑफलाईन माध्यमातूनही फास्टॅग हवा असल्यास तो तुम्हांला टोलनाक्यावर, बॅंकेमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान आता प्रवासादरम्यान टोलनाक्यावर आता स्कॅनरच्या माध्यमातून बारकोड स्कॅन होईल आणि तुमच्या अकाऊंटमधून थेट पैसे कापले जाणार आहे. तर त्याची व्हॅलिडीटी 5 वर्षांची आहे.