तुमच्या गाडीमध्ये लावण्यात आलेला पार्ट चोरीचा तर नाही? 'या' पद्धतीने तपासून पाहा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

येत्या ऑक्टोंबर महिन्यांपासून सर्व वाहनांमधील प्रमुख पार्ट्ससाठी QR कोड असणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. यासाठी सप्टेंबर महिन्यात रस्ते आणि वाहतूक मंत्रालय एक नोटीस जाहीर करण्यात असून त्यामध्ये हा मुद्दा मांडण्यात येणार आहे. त्यामुळे ओक्टोंबर नंतर तयार करण्यात येणाऱ्या प्रत्येक गाड्यांच्या मुख्य पार्ट्सवर QR कोड असणे आवश्यक असणार आहे. तसेच पार्ट्सवर लावण्यात आलेला कोड अल्ट्राव्हॉयलेट किरणांच्या मदतीने तुम्हाला पाहता येणार आहे. यामुळे चोरी केलेल्या वाहनाचा पार्ट्स लावण्यात आला आहे की नाही हे तपासून पाहणे सोपे होणार आहे.

सरकारकडून घेण्यात येणाऱ्या या निर्णयामुळे गाडीचे पार्ट्स चोरी होण्याचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्येक वर्षाला देशात 2.5 लाखांपेक्षा अधिक वाहनांची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. या चोरी करण्यात आलेल्या वाहनांमधील काही पार्ट्स काढून दुसऱ्या गा्ड्यांमध्ये लावण्यात येतात. तर वाहनामधील इंजिन आणि चैसी व्यतिरिक्त कोणत्याही पार्ट्सबद्दल सहजासहजी कळून येत नाही. कारण अशा पार्ट्सवर फक्त क्रमांक लिहिलेला असतो.(पावसाळ्यात बाईक चालवताना करुन नका 'या' चुका, नाहीतर अपघात होईल)

सध्या गाडीचे पार्ट्स चोरी होण्याचे प्रमाण फार वाढले आहे. त्यामुळेत आता वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांनी महागड्या पार्ट्सवर QR कोड लावणे बंधनकार असणार आहे. तर वाहन खरेदी केल्यावर त्या गाडीचे रजिस्ट्रेशन करतेवेळी चालकासह इंजिन आणि चैसी क्रमांकाची माहिती घेतली जाते.