Hero Splendor Plus BS6 झाली महाग; जाणून घ्या याच्या नव्या किंमतीविषयी
Hero Splendor Plus BS6 (Photo Credits: Twitter)

हिरो मोटो (Hero Moto Corp)  कंपनीने आपली Hero Splendor Plus BS6 किंमत वाढवली आहे. bikewale.com या संकेतस्थळावर याबाबत माहिती दिली आहे. नवीन किंमीतनुसार, या बाईकची सुरुवाती किंमत 60,500 रुपये इतकी असेल. Splendor Plus च्या सर्वच वेरियंट्सच्या किंमतीत वाढ केली आहे. तसे पाहायला गेले तर या बाईकमध्ये काही तांत्रिक बदल (Technical Change)  करण्यात आलेले नसूनही याच्या किंमतीत वाढ केली आहे. Splendor Plus बाइक 3 वेरियंटमध्ये येते. ज्याच्या किक स्टार्ट वेरियंटची किंमत 60,500 रुपये इतकी झाली आहे. याची आधी किंमत 60,350 रुपये इतकी होती.

तर मोटरसाइकल सेल्फ स्टार्ट वेरियंटची किंमत 62,800 रुपये इतकी झाली आहे जी आधी 62,650 रुपये इतकी होती. Hero Xtreme 160R भारतात लॉन्च, 4.7 सेंकदात पकडणार 0-60 kmph चा वेग

त्याचबरोबर प्लेंडर प्लस सेल्फ स्टार्ट i3S वेरियंटची कीमत 64,010 रुपये इतकी झाली आहे. याचाच अर्थ या सर्व बाईक्सच्या किंमतीत, 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

या बाईकच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 97.2cc, सिंगल-सिलिंडर, एयर-कूल्ड इंजिन दिले गेले आहे, जे 8,000rpm वर 7.8 bhp ची पॉवर आणि 6,000rpm वर 8.05Nm चा पीक टॉर्ट जनरेट करते. या बाइकमध्ये ट्यूबलेस टायर दिले गेले आहेत.

दरम्यान महिन्याभरापूर्वी Hero Xtreme 160R भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. Hero  Motocorp  यांनी ही बाईक दोन वेरियंट्समध्ये उपलब्ध करुन दिली आहे. Hero Xtreme 160 फ्रंट डिस्कसह सिंगल चॅनल ABS वेरिटंची किंमत 99,950 रुपये आणि डबल डिस्कसह सिंगल चॅनल ABS ची किंमत 1,03,500 रुपये आहे.