कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. परिणामी, अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. देशात गेल्या काही दिवासांपासून लॉकडाऊन अनेक निर्बंधांवर शिथिलता आणण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमधील नुकसानीची भरपाई करण्यासाठी अनेक कंपन्या विविध योजना आखताना दिसत आहे. यातच हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनीदेखील बाईक चाहत्यांसाठी आकर्षित ऑफर घेऊन आली आहे. यामुळे हिरो स्प्लेंडर, एचएफ डेल्युक्स, एक्सट्रिम 160 आर, हिरो एक्सप्लस 200 टी, हिरो ग्लॅमर यांसह सर्व बाईक्स आणि स्कूटरच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट मिळणार आहे.
ही ऑफर केवळ मर्यादीत काळासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत वरील सर्व बाईकच्या खरेदीवर तब्बल 7 हजार 500 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. ही ऑफर एक्सचेंज किंवा कॅशबॅक आयसीआयसीआय बॅंक आणि पेटीएमद्वारे मिळणार आहे. हे देखील वाचा- Timex चा शानदार फिटनेस बँन्ड भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक
हिरो सुपर स्पलेंडर, स्प्लेंडर प्लस किंवा एचएफ डिलक्स यांसारख्या बाईकच्या खरेदीवर ऑफर अंतर्गत 3 हजार 100 रुपयांचा कॅशबॅक डिस्काउंट मिळणार आहे. ज्यात 2 हजार 100 रुपये कॅश आणि 1 हजार रुपये टॉप अप रुपात येणार आहे. जर कस्टमर पेटीएम द्वारे बाईक खरेदी करीत असेल तर त्यांना 7 हजार 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
तसेच दिवाळी ऑफर अंतर्गत कॉर्पोरेट ग्राहकांना 2 हजार रुपयांची बचत करता येणार आहे. याशिवाय विविध मॉडलवर 2 हजार 100 रुपयांचा कॅशबऍक मिळणार आहे. आयसीआयसीआय बॅंकेच्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे. आयसीआयसीआय बॅंकेच्या कार्डवरून 5 हजार रुपयांचे कॅशबॅक मिळू शकतो. तसेच कंपनी लवकरच हिरो मोटोकॉर्प लवकरच एक्सट्रिम 200 एस आणि एक्सप्लस 200 टी या बाईक लाँच करणार आहेत.