Harley Davidson: प्रसिद्ध अमेरिकन बाइक कंपनी हार्ले डेविडसन भारतात असेंम्बली प्लांट करु शकते बंद; विक्री कमी होत असल्याने घेतला निर्णय- रिपोर्ट
Harley-Davidson bike Only representative photos | (Photo Credits: Twitter)

भारतातील जगप्रसिद्ध हार्ले डेविडसन (Harley Davidson) बाइक प्रेमींसाठी वाईट बातमी! लवकरच ही अमेरिकन कंपनी आपले भारतातील असेंम्बली प्लांट बंद करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, भारतात या बाईकची विक्री कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, भारतीय बाजारात याची विक्री सुरु राहील. 'द हिंदू' ने प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. मागील 10 वर्षापासून भारतीय बाजारात ही कंपनी कार्यरत आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, मागील वर्षी भारतामध्ये हार्ले डेविडसन ची 2500 पेक्षा कमी यूनिट्सची विक्री झाली. त्यामुळे ही विक्री कंपनीकरिता समाधानकारक नसल्याचे आढळून आले आहे. जर या कंपनीने भारतातील गाशा गुंडाळला तर डोनाल्ड ट्रंप राष्ट्रपती झाल्यानंतर ही दुसरी अमेरिकन वाहन कंपनी असेल जिने भारतातून बॅक आऊट केले असेल. Harley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर

याआधी जनरल मोटर्सने वाहनाची कमी विक्री होत असल्या कारणाने 3 वर्षाआधी आपला गुजरात प्लांट विकला होता. हार्ले डेविडसन च्या अधिका-यांनी सांगितले की, 'भारतात मागील वित्त वर्षात 2500 पेक्षा कमी यूनिट्स विक्री होती. तर एप्रिल-जून 2020 मध्ये भारतात हार्ले डेविडसन चे 100 बाईक्सची विक्री झाली होती. ज्यामुळे भारत हा हार्ले डेविडसनची खराब विक्री करणारा आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा एक बनला. ज्यामुळे हार्ले डेविडसनने हे पाऊल उचलले आहे.'