Google वर 2019 मध्ये सर्वात जास्त 'या' कार बद्दल करण्यात आले सर्च, जाणून घ्या खासियत
Maruti Suzuki Baleno (Photo Credits-Twitter)

2019 या वर्षात ऑटो सेक्टर मधील विविध कंपन्यांनी त्यांच्या नव्या मॉडेलमधील गाड्या लॉन्च केल्या. तर यंदाचे वर्ष संपण्यापूर्वी नागरिकांनी 2019 मध्ये कोणत्या टॉप कार लॉन्च झाल्या आहेत ते सर्च केले आहे. त्यानुसार मारुती सुझुकी, हुंड्याई, टोयोटा फॉर्च्युनर, एमजी हक्टर, महिंद्रा एक्सयुव्ही 300 या कार सर्वाधिक सर्च करण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारातील या कार लोकांनी सर्च केल्या आहेत खरे पण त्याची खासियत काय आहे हे तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत.

Maruti Suzuki Baleno ही गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेली आणि पहिल्या क्रमांकावरील कार आहे. या कारच्या इंजिन आणि पॉवर बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 1197CC चे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 6 हजार Rpm वर 66 Kw ची पॉवर आणि 4400 Rpm चे टॉर्क जनरेट करते. यामध्ये दुसरा 1248CC चे 4 सिलेंडर असणारा डीझल इंजिन दिला आहे. कारच्या किंमती बाबत बोलायचे झाल्यास Baleno ची सुरुवाती किंमत 5,58,602 ते 8,90,212 रुपये आहे.

Hyundai Venue ही दुसऱ्या क्रमांकावर असून यामध्ये 1197cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे 6 हजार Rpm साठी 83 Ps ची पॉवर आणि 4 हजार Rpm वर 114.7 NM चा टॉर्क जनरेट करतो. या कारची सुरुवाती किंमत 6,50,000 रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावरील Toyota Fortuner या कारसाठी 275CC चे इंजिन दिले असून 3400 Rpm वर 177 PS ची पॉवर आणि मॅन्युअरल ट्रान्समिशन 1400-2600 Rpm वर 420 Nm टॉर्क जनरेट करणार आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास Toyota Fortuner ची सुरुवाती किंमत 27,83,000 ते 33,60,000 रुपये आहे.(पेट्रोलशिवाय चक्क 300 किलोमीटर धावणारी Tata Nexon इलेक्ट्रिक SUV कार लवकरच होणार लॉन्च)

 चौथ्या क्रमांकावर MG Hector या कारमध्ये 1.5 लीटरचे इंजिन असून ते 5 हजार Rpm वर 143 Ps ची पॉवर निर्माण करतो. 1600-3600 Rpm वर 25- Nm चा टॉर्क जनरेट करतो. यामधील दुसरे इंजिनसाठी 5 हजार Rpm वर 143 Ps ची पॉवर आणि 1600-3600 Rpm वर 250 Nm चा टॉर्क जनरेट करु शकतो. तर पाचव्या क्रमांकावर Mahindra XUV300 या कारची किंमत 8,30, 000 हजार रुपये आहे. या कारसाठी 1.2 लीटरचे इंजिन देण्यात आले आहे. जे 6300 Rpm वर 110 ची पॉवर आणि 4500 Rpm साठी 170 Nm टॉर्क जनरेट करते.