वाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम
प्रातिनिधिक प्रतिमा (Pic Credit: Yogen Shah)

जर का तुमच्या घरी कार किंवा बाईक आहे, तर ही बातमी तुमच्य्साठी फार महत्वाची आहे. कारण सध्या देशात कार आणि बाईकच्या नंबर प्लेट्स संदर्भात काही नवे नियम लागू झाले आहेत. हे नियम तुम्हास माहित असणे गरजेचे आहे, कारण परिवहन विभागाचे हे नियम तुम्ही जर मोडले तर तुम्हाला 10 हजारांचा दंड होऊ शकतो. इंधनाचे वाढते दर आणि त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन भारतात ई-कारचा वापर वाढावा यासाठी सरकारची एक नवी योजना आहे. केंद्र व राज्य सरकार त्यासाठी अनुदान देते, रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कही माफ करते. अशा ई-कारना हिरवी नंबर प्लेट देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्यामुळे रस्त्यावर अशा हिरव्या रंगाच्या नंबर प्लेट्सही दिसू लागल्या आहेत. चला तर पाहूया काय आहेत हे नियम.

> कार किंवा बाईकवरील नंबर प्लेटच्या संख्यांचा आकार कमीत कमी दोन इंच असणे आवश्यक आहे.

> कार किंवा बाईकवर लावलेल्या नंबर प्लेटवरील क्रमांक हे वाचण्याजोगे असावेत. यासाठी कोणतीही फॅन्सी नंबर प्लेट लावणे हे नियमबाह्य ठरेल.

> कार किंवा बाईक नंबर प्लेटवरील सर्व क्रमांक हे एकसारख्या आकाराचे आणि थेट आकाराचे असणे बंधनकारक आहे.

> जर तुमची गाडी चोरी झाली, तर ती व्यक्ती सुप्रीम कोर्टाने नवीन सर्क्युलर जारी केल्याप्रमाणे पुन्हा जुन्या गाडीचा नंबर नवीन गाडीच्या नंबर प्लेटवर लावू शकतो.

> नंबर प्लेटवर कोणत्याही प्रकारचे सांकेतिक चिन्ह किंवा तत्सम गोष्टी लावणे नियमांच्या विरोधात असेल.

सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्देशानुसार परिवहन विभाग यांच्याकडून हे 5 नवीन नियम लागू केले आहेत आणि जर या 5 नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचीही नंबर प्लेट तपासा आणि जर की या वरील नियमांच्या विरोधात ती असेल तर ताबडतोप सध्याची नंबर प्लेट बदलून घ्या.