Driving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय? येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल
Driving Licence Representational Image (File Photo)

भारतात ड्रायव्हिंग लायसन्स असे एक कागदपत्र आहे जे तुम्हाला देशभरात वाहन चालवण्याची परवानगी देते. ड्रायव्हिंग लायसन्स 20 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना दिले जाते. ड्रायव्हिंग लायसन्स वरील तारीख संपल्यानंतर ते तुम्हाला रिन्यू करावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्स अशा व्यक्तिंसाठी गरजेचे आहे जे सार्वजिनक रस्त्यांवर कार किंवा बाईक चालवतात. त्यामुळे नेहमीच कोणतेही वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवणे अनिवार्य आहे. पण जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स व्यतिरिक्त वाहन चालवत असल्यास तुम्हाला दंड भरावा किंवा ते सीज होऊ शकते.

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर 30 दिवस म्हणजेच 1 महिन्याचा कालावधीत तुम्ही ते रिन्यू करु शकता. ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी तुम्हाला 200 रुपये मोजावे लागतात. पण रिन्यूचे दर हे विविध राज्यात वेगळे ठरवलेले असतात.(Old Car Selling Tips: जुनी गाडी विकताना 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा, मिळेल उत्तम किंमत)

**अशा पद्धतीने करा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू-

>>जर तुम्हाला रिन्यू करायचे असल्यास प्रथम तुम्हाला परिवहन बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.

>> येथे ऑनलाईनच्या ऑप्शनवर क्लिक करा.

>>तेथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सर्विसेसवर क्लिक करावे.

>>तुम्हाला तुमचे राज्य कोणते आहे ते निवडावे लागणार आहे.

>>तुम्हाला एका नव्या पेजवर रिडायरेक्ट केले जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केल्यानंतर सिलेक्ट सर्विस ऑन ड्रायव्हिंग लायसन्सवक क्लिक करावे.

>> त्यानंतर तुम्हाला काही सुचना दिल्या जातील तेथे तुम्हाला एक अॅप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार आहे. या सुचना वाचल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करावे.

>> तुम्हाला जन्मतारीख आणि सध्याचे लायसन्स नंबर पिन कोडसह अन्य डिटेल्स द्यावी लागणार आहे.

>>रिक्वायर्ड सर्विसेसच्या येथे तुम्हाला रिन्यूअलवर क्लिक करावे.

>>तेथे तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करावी लागणार आहे. लक्षात असू द्या हे फिचर काही राज्यांमध्ये उपलब्ध आहे.

>>पुढे गेल्यावर तुम्हाला एक्नॉलेजमेंट पेजवर रिडायरेक्ट केले जाणार आहे. येथे Application ID पाहू शकता. त्याचसोबत रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक SMS वर मिळणार आहे.

>>लायसन्स रिन्यू करण्यासाठी तुम्हाला 200 रुपये मोजावे लागणार आहेत. ते तुम्ही नेट बँकिंग/डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करु शकता.

**ऑफलाईन पद्धतीने कसे कराल ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू-

>>जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करत असल्यात त्यावेळी प्रथम तुम्हाला आरटीओ ऑफिसला भेट द्यावी लागणार आहे. येथे तुम्हाल Form-9 घ्यावा लागणार आहे.

>>या फॉर्मसाठी तुम्हाला महत्वाची कागदपत्र द्यावी लागणार आहेत.

>>फोनमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित माहिती भरावी लागणार आहे. तसेच फोटो सुद्धा लावावा लागणार आहे.

>>यासाठी तुम्हाला 200 रुपये द्यावे लागणार आहेत. मेडिकल सर्टिफिकेट मध्ये काही बदल झाल्यास तुम्हाला टेस्ट स्टॉल बुक करावा लागणार आहे.

>>यानंतर तुम्हाला एक परिक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही पास झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स काही दिवसांनी दिले जाणार आहे.

तर वरील पद्धतीने तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर वाहन चालवताना महत्वाची कागदपत्र त्यावेळी आपल्यासोबत बाळगा. मुख्य म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन करा.