CFMoto 650 MT बाईक टेस्टिंग दरम्यान भारतात दिसली, जाणून घ्या किंमत आणि खासियत
CFMoto 650 MT (Photo Credits-Twitter)

चीन मोटरसायकल ब्रँड CFMoto त्याचे नवीन मॉडेल असलेली मध्यम अॅडव्हेंचर टूर बाईक म्हणजेच CFMoto 650 MT भारतात लवकर लॉन्च करणार आहे. काही दिवसांपूर्वी CFMoto roadster आणि CFMoto 250 NK ह्या मॉडेलमधील बाईक भारताच्या रस्त्यावर टेस्टिंग दरम्यान चालवताना दिसून आल्या. तसेच या सुपर बाईकबाबत अद्याप काम सुरु असल्याचे सांगितले आहे. CFMoto ही मिडलवेट नेकेटवर आधारित असणार आहे. तसेच CFMoto 650 NK ही आधीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भारतात अॅडव्हेंचर बाईकची मागणी वाढत असल्याने CFMoto आपली 650 MT लवकरच घेऊन येणार आहे.

650 MT मध्ये 649cc, लिक्विड कूल्ड,DOHC, पॅरेलेल-ट्विन इंजिन देण्यात आले असून जे 8,750 rpm वर 70bhp ची पॉवर निर्माण करु शकणार आहे. त्याचसोबत 7,000rpm वर 62Nm चे टॉर्क जनरेट करु शकणार आहे. इंजिन 6-स्पिड गियअरबॉक्सपेक्षा कमी असणार असून 170kmph च्या टॉप स्पीडचा दावा करण्यात येत आहे. CFMoto 650 MT चे वजन 213 किलोग्रॅम आहे. तर ग्राऊंड क्लिअरेंस 170mm आहे.

CFMoto 650 MT ची किंमत जवळजवळ 4 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तसेच बाईकच्या पुढील बाजूस 300mm डिस्क आणि रियर व्हिलसाठी 240mm सिंगल डिस्क देण्यात आले आहे.