10 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असणाऱ्या गाड्यांच्या किंमतीत 'या' कारणामुळे होणार वाढ
कार्स (फाईल फोटो)

भारतात 10 लाख रुपये किंमतीपेक्षा जास्त महागड्या गाड्यांची किंमतीत लवकरच वाढ होणार आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, यामागील कारण सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेज आणि कस्टम्स यांनी घेतलेल्या गाड्यांच्या बाबतीतल्या निर्णयामुळे गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तसेच सरकारच्या मते जीएसटी (GST) फक्त वस्तूंवरील किंमतीवरच नाही तर Income Tax आणि Invoice Value या सोबत TCS वर सुद्धा लागू करण्यात येणार आहे.

10 लाख रुपये किंमत असणाऱ्या गाड्यांवर TCS त्यांच्या शोरुमची 1% किंमत लावली जात असून त्यात जीएसटीची रक्कमही स्विकारण्यात येते. तसेच आयकरच्या नियमानुसार वस्तूंची योग्य माहिती आणि पेमेंटच्या वेळची रक्कम याबद्दल आयकर विभागाला सांगणे अत्यावश्यक असते.

तर ऑटोमोबाईल्स तज्ञांच्या मते, या सर्वाचा परिणाम ऑटोमोबाईल्स कंपन्यानवर होतो. तसेच गाड्यांच्या किंमती आधिच महाग असल्याने त्यात आणखी भर घातल्याने ग्राहक महागड्या गाड्या खरेदी करण्यापूर्वी विचार करतात.