BMW Motorrad ने शनिवारी भारतात आपली बहुप्रतिक्षित R18 क्रुझर बाईल लॉन्च केली आहे. भारतात या बाईकची किंमत 18.90 लाख सुरुवातील किंमत लॉन्च केली आहे. मोटरसायकल दोन मॉडेल म्हणजेच R18 (स्टँडर्ड) बेस मॉडेल आणि दुसरा R18 (फर्स्ट अॅडीशन) ची सुरुवाती किंमत 21.90 लाख रुपये एक्स शो रुपये आहे. BMW R18 ची नुकतीच लॉन्च झालेली Harley-Davidson Fat Boy आणि Triumph Rocket 3GT क्रुझर बाइक्सला टक्कर देणारी ठरणार आहे. कंपनीने BMW R18 साठी बुकिंग सुरु झाली आहे. ही बाईक 1 लाख रुपयांचे टोकन देऊन बुक करता येणार आहे. जर तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असल्यास BMW Motorrad डीलर नेटवर्कच्या माध्यमातून पूर्णपणे निर्मित सीबीयू रुपात ऑर्डर केली जाऊ शकते.
बीएमडब्लू आर18 क्रुझर बाइकमध्ये 1802 सीसीचे एअर/ऑयल-कूल्ड इंजिन दिले आहे. जे बाईकचे मुख्य आकर्षण आहे. बीएमडब्लू नुसार, त्यांच्या द्वारे निर्मित सर्वात मोठे बॉक्सर इंजिन आहे. हे 1930 दशकात जुन्या बीएमडब्लू क्रुजर्स इंजिन सारखे असून त्यामध्ये ड्राइव्ह शाफ्टचा वापर केला जातो. हे इंजिन 4750 आरपीएमवर 91 बीएचपीची मॅक्सिमम पॉवर आणि 3000 आरपीएमवर 157 एनएन पीक टॉर्क जेनरेट करणार आहे.(Kia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु)
कंपनीच्या या बाईकच्या फिचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, तुम्हाला उत्तम पेंट आणि क्रोम वर्क पहायला मिळाला आहे. जो बाईकला शानदार लूक देणार आहे. त्याचसोबत बाईकची स्पेशल हायलाइट मध्ये ब्लॅकस्टॉर्म मेटॅलिक पेंटवर्क, सीट बैज, हेडलाइट प्रो, अॅडाप्टिव्ह हेडलाइड आणि डे टाइन रायडिंग लाइटचा समावेश आहे. बाईकमध्ये 3 स्टँडर्ड राइडिंग मोड दिले आहेत. यामध्ये रेन, रोल आणि रॉक यांचा समावेश आहे. जर तुम्ही बाईकच्या स्टँडर्ड फिचर्ससाठी तुम्हाला ऑटोमेटिक स्टेबिलिटी कंट्रोल, डायनॅमिक इंजिन ब्रेक कंट्रोल, हिल स्टार्ट कंट्रोलसह की-लेस राइड सिस्टिम दिला आहे. जो बाईकला उत्तम हायटेक बनवतो. बीएमडब्लू नुसार, R19 क्रुझर मध्ये त्यांच्याद्वारे बनवण्यात आलेले सर्वात मोठे बॉक्सर इंजिन लावले आहे. हे इंजिन बाईकला जबरदस्त पॉवर देणार आहे. ग्राहकांना एक उत्तम रायडिंग अनुभव देणार आहे.