बीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 46 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Rudratej Singh (Photo Credit: Twitter)

बीएमडब्ल्यू इंडियाचे सीईओ (BMW India CEO) रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Rudratej Singh Passed Away) झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीएमडब्ल्यूच्या कारभारात मोलाचा वाटा उचलणारे रुद्रतेज यांनी वयाच्या 46 वर्षीच अखेरचा श्वास घेतला आहे. यांच्या या निधनाने संपूर्ण ऑटो मोबाईल क्षेत्रात शोककळा पसरली आहे. रुद्रतेज सिंह यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, सुत्रानुसार त्यांच्या मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, बीएमडब्ल्यू कंपनीच्या सदस्यांनी रुद्रतेज सिंह यांच्या स्मरण करत त्यांच्या कामाचे कौतूकही केले आहे. तसेच त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का लागला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा

रुद्रतेज सिंह यांनी ऑटो मोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्यात काम केले आहे. बीएमडब्ल्यू इंडियामध्ये कार्यरत होण्याआधी रुद्रतेज सिंह हे रॉयल एनफील्ड समूहाचे अध्यक्ष म्हणून कारभार संभाळत होते. जर्मनीची कंपनी बीएमडब्ल्यूने 1 ऑगष्ट 2019 मध्ये बीएमडब्ल्यू इंडियाची जबाबदारी रुद्रतेज यांच्यावर जबाबदारी सोपावली होती. तसेच बीएमडब्ल्यू इंडियाच्या प्रमुख पदाची कारभार स्वीकारणारे रुद्रतेज सिंह हे पहिले भारतीय ठरले होते. एवढेच नव्हेतर, त्यांनी आपल्या जीवनातील 16 वर्ष ऑटो मोबाईल क्षेत्रात घालवले आहेत. रुद्रतेज यांच्या निधानाची बातमी ऐकताच त्यांच्यावर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.