इलेक्ट्रिक कंम्पोनेट्स बनवणारी दिग्गज कंपनी RR Global यांनी देशात इलेक्ट्रिक टू-व्हिलरच्या सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. कंपनीने BGauss ब्रेक अंतर्गत इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स लॉन्च करणार आहे. BGauss यांनी दोन इलेक्ट्रिक स्कूटर्स झळकावल्या असून ऑगस्ट 2020 च्या पहिल्याच आठवड्यात बाजारात लॉन्चिंग करण्यात येण्याची शक्यता आहे. या दोन्ही BGauss A2 आणि BGauss B8 इलेक्ट्रिक स्कूटर लो-स्पीड आणि मिड-स्पीड वर्जनमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.(पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त? भारतातील 'या' दमदार CNG कारबाबत जरुर जाणून घ्या)
BGauss B8 ही तीन वेरियंट मध्ये तर BGauss A2 इलेक्ट्रिक स्कूटर दोन वेरियंटमध्ये येणार आहे. B8 स्कूटर 1900 वॅट , हब-माउंटेड मोटर आणि 1.45kWh बॅटरीसह हाय परफॉर्मेन्स असणारे वर्जन आहे. त्याचसोबत B8 लेड-एसिड बॅटरी रिमुव्हेबल लिथियम आयन बॅटरीसह येणार आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये लेड-अॅसिड मॉडेल, लिथियम-आयन मॉडेल आणि LI टेक्नॉलॉजी मॉडेल अशा नावाने तीन वेरियंटमध्ये येणार आहे. तिन्ही वेरियंटची टॉप स्पीड 50 किमी प्रति तास आहे. टॉप मॉडेलमध्ये नेविगेशन असिस्ट, राइड मॅट्रिक्स, रिमोट डायग्नोस्टिक्स, लाईव्ह ट्रॅकिंग आणि जिओ फेसिंग सारखे फिचर्स मिळणार आहेत. कंपनीने असा दावा केला आहे की, BGauss B8 इलेक्ट्रिक स्कूटरचे लेड-अॅसिट मॉडल एकदा फुल्ल चार्ज झाल्यास 78 किमी आणि लिथियम-आयन मॉडेल 70 किमी पर्यंत धावणार आहे.(Kia Seltos ची इलेक्ट्रॉनिक कार लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक )
BGauss A2 बाबत बोलायचे झाल्यास ही स्लो-स्पीड स्कूटर आहे. यामध्ये 250 वॅट मोटर दिले आहे. याची टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे. कंपनीने असा दावा केला आहे की,, A2 इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फुल्ल चार्ज केल्यास 110 किमी पर्यंतचे अंतर गाठू शकणार आहे. यामध्ये सुद्धा लेड अॅसिड बॅठरी आणि 1.29kW रिमुव्हेबल लिथियम आयन बॅटरीचे ऑप्शन देण्यात आले आहे. BGauss या दोन्ही इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये तीन रायडिंग मोड असणार आहे. त्यानुसार लो, मिड आणि हाय रायडिंग मोड यांचा समावेश असणार आहे. स्कुटर ब्लू, ग्लेशियर आइस आणि व्हाइट रंगात उपलब्ध असणार आहे. तर B8 स्कूटर रेड, ब्लू, ग्रे आणि व्हाईट रंगात येणार आहे.
BGauss B8 आणि BGauss A2 इलेक्ट्रिक स्कुटर्सच्या किंमती बाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र याची किंमत 50 हजार ते 1.4 लाख रुपयापर्यंत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.