(संग्रहित प्रतिमा)

पेट्रोल कितीही महाग झालं तरी, 'होऊ दे खर्च' म्हणत तरुणाईला रेसिंग बाईक्सच आवडतात. त्यात ज्याची बाईक क्षणात वेग पकडते आणि नजरेआड होते त्या कॉलेज कुमारची कॉलर तर नेहमीच टाईट. त्यामुळे रेसिंग बाईकला आजकाल जोरदार मागणी आहे. रस्त्यावर दिसणाऱ्या बहुतांश बाईकपैकी रेसिंग बाईकचा आकडा मोठा आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, भारतीय बाजारांतील सर्वात स्वस्त रेसिंग बाईकबद्दल...

केटीएम आरसी 390 (KTM RC390)

केटीएम बाईकच्या या मॉडेलमध्ये ३७५ सीसीचे सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. जे ४३ बीएचपी पॉवर आणि ३७ एनएमची टॉर्क निर्मिती करते. ही बाईक ५.६ सेकंदामध्ये १०० किमी इतक्या वेगाने धाऊ शकते. केटीएम आरसीची किंमत बाजारात २.३४ लाख रुपये (दिल्लीतील एका शोरुममध्ये) इतकी सांगितली जात आहे.

केटीएम ३९० ड्यूक (KTM 390DUKE)

केटीएम ड्यूक ३९० ही बाईक भारतात विकल्या जाणाऱ्या पॉवरफूल रेसिंग बाईक्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. या बाईकमध्ये ३७३ सीसी, सिंगल सिलिंडर लिक्विड इंजिन दिले आहे. ही बाईक ४३ बीएचपीची पॉवर आणि ३७ एनएमचा टॉर्क जनरेट करते. इंजिनला ६-स्पीड गियरबॉक्स असून, बाईकचे व्हीलबेस २३५७ मिमी, ग्राऊंड क्लियरन्स १७८ मिमी आणि फ्यूल टॅंक १३.५ लीटरचे आहे. 2017 KTM Duke 390ची किंमत २.२५ लाख रुपये (मुंबईतील एका शोरुममध्ये ) आहे.

यामाहा YZF-R3 (YAMAHA YZF- R3)

यामाहाची बाईक लिक्विड कूल्ड, ३२१ सीसी पॅरलल-ट्विन लिक्विड कूल्ड इंजिसनोबत येते. हे इंजिन ७५० आरपीएम वर ४२.०पीएस पॉवर आणि इलेक्ट्रॉनिक फ्यूल सिस्टमच्या मदतीने ९,००० आरपीएमवर २९०.६ एनएमचा टॉर्क जनरेट करते. यामाहा YZF-R3 (YAMAHA YZF- R3)ची किंमत ३.४८ लाख रुपये (मुंबईतील एका शोरुममध्ये ) आहे.

टीव्हीएस अपाची आरआर 310 (TVS APACHE RR )310,

टीव्हीएसची या बाईकला ३१३ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. जे ३४ बीएचपीची पॉवर जनरेट करते आणि २८ एनएमचा टॉर्क जनरेट करते. इंजनमध्ये ६-स्पीड ट्रान्समिशन दिले आहे. या बाईकमध्ये राईड करताना सर्वा माहिती देण्यासाठी सुमारे १५ फंक्शन दिले आहेत. टीव्हीएसची ही बाईक १०० किलोमीटरचे स्पीड पकडण्यासाठी केवळ सात मिनीटांचा अवधी घेते. या बाईकची दिल्लीतील एक्स शोरुममध्ये किंमत २.५ लाख इतकी आहे.

कावासाकी निन्जा 300 (kawasaki ninja 300 )

कावासाकी निन्जा ३००मध्ये कंपीने २९६ सीसीचे लिक्विड कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन दिले आहे. जे ३८.४ बीएचपी पॉवर आणि २७ एनएमची टॉर्क निर्मिती करते. इंजनला ६ स्पीड गियरबॉक्स दिले आहेत. ही बाईक ०ते १०० किमी प्रतितास वेगाने धावते. त्यासाठी या बाईकला स्पीड पकडायला केवळ ५ सेकंद लागतात.या बाईकची किंमत कंपनीने २.९८ लाख रुपये ( मुंबईतील एका शोरुममध्ये) इतकी ठेवली आहे.