Bajaj कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Chetak Launch; किंमत, मॉडेल आणि फिचर्सबाबत घ्या जाणून
Bajaj Chetak E-scooter

बजाज ऑटो (Bajaj Auto) कंपनीने आपली लेजेंड्री स्कूटर बजाज चेतक (Chetak) आज (16 ऑक्टोबर 2019) नव्या रुपात लॉन्च केली. चेतक कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. सुरुवातीला सांगितले जात होते की, कंपनी आपल्या इलेक्ट्रिक वाहन अर्बनाइट (Urbanite) खाली ही स्कूटर विक्री करेन. परंतू , कंपनीने शेवटी स्कूटरचे नाव चेतक असेच कायम ठेवले आहे. या स्कूटरच्या लॉन्चींग इव्हेंटला 'हमारा बजाज' अशी टॅगलाईन दिली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कात उपस्थित होते. चेतक इलेक्ट्रिक स्कूटर चे उत्पादन कंपनीने 25 सप्टेंबर 2019 पुणे येथील चाकन औद्योगिक वसाहतीत सुरु केले होते. ही स्कूटर बाजारात Okinawa Scooters, Hero Electric, Ather Energy, Ampere Electric Vehicles या ब्रॉंडला टक्कर देतील अशी चर्चा आहे.

बजाज चेतकमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोणातून इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (IBS) दिली आहे. मोठे डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनल, बॅटरी रेंज, ओडोमीटर आणि ट्रिपमीटर अशा विविध गोष्टी आहेत. स्कूटरच्या किमतीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, जाणकारांनी सांगितले की, या स्कूटरची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत असू शकते. (हेही वाचा, 'या' कंपनीने बाजारात आणली तब्बल 31 हजाराची इलेक्क्ट्रिक सायकल; जाणून घ्या वैशिष्ट्ये)

स्कूटरच्या स्टाईलबाबत बोलायचे तर ही स्कूटर दिसायला आगोदरच्या स्कूटरप्रमाणेच आहे. ही स्कूटर पाहून आपल्याला रेट्रो लूकवाली स्कूटर आठवेल. फ्रंट ऐप्रन, कर्व साइड पॅनल आणि मोठे आरसे यांसोबत स्कूटरचा एकूणच लूक छान आहे. दरम्यान, बजाज ऑटो ने चेतक (Chetak) या ब्रॉंडचे उत्पादन 2006 मध्ये बंद केले होते. कंपनीने हा ब्रॉंड 1972 मध्ये लॉन्च केला होता. गेल्या काही वर्षांपासून बजाजचे लक्ष्य बाईक बनवण्यावर राहिले आहे. मात्र, स्कूटरच्या रुपात कंपनी पुन्हा एकदा मूळ ब्रॉंड घेऊन येत आहे.