'या' कंपनीने बाजारात आणली तब्बल 31 हजाराची इलेक्क्ट्रिक सायकल; जाणून घ्या वैशिष्ट्ये
लेक्ट्रो ई-मोबिलिटी सोल्यूशन्स लिमिटेडने (Lectro E-Mobility Solutions Ltd) एक नवीन इलेक्ट्रिक सायकल, 'टाउनमास्टर इलेक्ट्रिक सायकल' (Townmaster Electric Bicycle) देखील बाजारात आणली आहे.
आजकाल इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि सायकलची क्रेझ वाढत आहे. यामुळे कंपन्या नवनवीन उत्पादनेही बाजारात आणत आहेत. आता लेक्ट्रो ई-मोबिलिटी सोल्यूशन्स लिमिटेडने (Lectro E-Mobility Solutions Ltd) एक नवीन इलेक्ट्रिक सायकल, 'टाउनमास्टर इलेक्ट्रिक सायकल' (Townmaster Electric Bicycle) देखील बाजारात आणली आहे. या सायकलची किंमत भारतात 30,999 रुपये आहे. टाउनमास्टर ही एक थ्रॉटल ई-बाईक आहे आणि आपण केवळ नियमित प्लग पॉईंटच्या मदतीने ही सायकल चार्ज करू शकता. म्हणजेच ही सायकल चार्ज करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्याही विशेष चार्जिंग स्टेशनवर जावे लागणार नाही.
वैशिष्ट्ये -
ही ई-सायकल एकदा चार्ज केल्यावर तीन तास चालवू शकता. तर एका चार्जमध्ये तुम्ही 30 ते 40 किलोमीटर अंतर कपू शकता. यात आपणास सस्पेंशन, कायम हेडलाइट, अंतर्गत केबल राउटिंग आणि डबल डिस्क ब्रेक यासारखे उत्कृष्ट वैशिष्ट्ये मिळतात. याच वैशिष्ट्यांमुळे ही ई-सायकल एक सुरक्षित आणि अपिलिंग वाहन बनते. या सायकलीला युनायटेड किंगडममध्ये डिझाइन केलेले असून, त्यात बॅटरी सेफ्टीसाठी इन्सुलेटेड बॅटरी सिस्टम आणि Kenda चे के शिल्ड-पंचर रेजिस्टंट टायर्स (K-Shield Puncture-Resistant Tyres) आहेत. हे रायडरला त्यानुसार मोड बदलण्याचा पर्याय देखील देते.
फायरफॉक्स सायकलचे संचालक आदित्य मुंजाळ यांनी या सायकली विषयी सांगितले की, भारतात तंदुरुस्ती व पर्यावरण याविषयी जागरूक असलेल्या ग्राहकांची नवीन गट तयार होत आहे. यामुळेच सायकलसारख्या वस्तूंचे उत्पादन वाढत आहे. गेल्या काही वर्षांत सायकलींची मागणीही फार वाढत आहे. लेक्ट्रो टाऊनमास्टर या प्रकारच्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आले आहे. शहराच्या कठीण ड्राइव्हनुसार टाउनमास्टर तयार करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2019 03:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

