Audi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Audi ने आपली पहिली इलेक्ट्रिक कार e-tron आज भारतात लॉन्च करण्यात आली आहे. त्यामध्ये ई-ट्रॉनची किंमत 99.99 लाख रुपये आणि ई-ट्रॉन स्पोर्टबॅकची किंमत 1.18 कोटी रुपये आहे. दोन्ही ईवी सध्या डिलरशीप किंवा ऑडी ऑनलाईन पद्धतीने बुक करता येणार आहे. तर बुकिंगसाठी 5 लाख रुपये मोजावे लागणार आहे. कंपनीने ही कार तीन वेरियंट e-tron50, e-tron55 आणि e-tron sportback मध्ये लॉन्च केली आहे.(Ola Electric scooter : ओला इलेक्ट्रिकने आपल्या नवीन दर्जेदार ई-स्कूटरचे सुरू केले बुकिंग, जाणून घ्या कसे कराल प्री-बुकिंग)

ऑ़डी ई-ट्रॉन 50 एसयुवी मध्ये एक 71kWh बॅटरी आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्सचा वापर केला आहे. हे कॉन्फिगरेशन 540nm च्या पीक टॉर्कसह 308bhp ची पॉवर देणार आहे. तर ही एसयुवी 6.8 सेकंदात शून्य ते 100 किमी तास वेग पकडणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही पॉवरट्रेन एकदा चार्ज केल्यानंतर 264 किमी ते 379 किमीची ड्रायविंग रेंजचा दावा केला आहे.(World's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर Watch Video)

दुसऱ्या बाजूला ऑडी ई-ट्रॉन 55 आणि ओई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55 मध्ये 95 kWh बॅटरी पॅकचा उपयोग केला जाणार आहे. जो 664 एनएमसह 396.5 बीएचपीतयार करणार आहे. ती प्रति चार्जसाठी 359 ते 484 किमीची ड्रायविंग रेंज देणार आहे. ई-ट्रॉन 55 आणि ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55 दोन्ही 5.7 सेकंदात शून्य ते 100 किमी तास वेग पकडणार आहे. तिन्ही ई-ट्रॉन वेरियंट 11kW एसी पोर्टेबल चार्जर आणि एक अन्य एसी वॉल-बॉक्स चार्जरसह येणार आहे. मात्र ई-ट्रॉन 55 आणि ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55 सुद्धा 150 किलोवॅट डीसी चार्जिंगचा सपोर्ट दिला जाणार आहे.