Flipkart Lays OFF

Flipkart Job Cuts: वॉलमार्टच्या (Walmart) मालकीची फ्लिपकार्ट कंपनीने कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे  5-7% ने कर्मचाऱ्यांची घट होऊ शकते, असे तज्ज्ञानी अहवालात सांगितले आहे. कामगिरीच्या पुनरावलोकनांचा एक भाग म्हणून मार्च-एप्रिलपर्यंत हे योजना पूर्ण केले जाईल. Flipkart गेल्या दोन वर्षांपासून या कामगिरीवर आधारित नोकरीतील कपात दरवर्षी राबवली आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षभरात नवीन नियुक्तीही गोठवली आहे. (हेही वाचा- रोल्स रॉयसमध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात; तब्बल 2,500 लोकांना कामावरून काढले जाणार)
Flipkart गेल्या 2 वर्षांपासून कामगिरीच्या आधारावर टाळेबंदी करत आहे.याशिवाय, कंपनीने आपला खर्च कमी करण्यासाठी गेल्या वर्षी कोणतीही नवीन भरती केली नाही. फ्लिपकार्ट ही देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. वॉलमार्टच्या मालकीची कंपनी तिची संसाधने आणि ऑपरेशन्स करण्यासाठी पुनर्रचनेच्या टप्यातून जात आहे. फॅशन पोर्टल Myntra वगळता, सध्या या कंपनीमध्ये २२,००० लोक कार्यरत आहेत.

गेल्या वर्षी, जागतिक ई-कॉमर्स कंपनी Amazon ने वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट मार्च 2024 मध्ये आपले कर्मचारी कमी करण्यास आणि नवीन पुनर्रचना योजना लागू करण्यास सुरुवात करेल. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, भारतीय ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने 'कार्यप्रदर्शनाच्या आधारे टाळेबंदी लागू करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या दोन वर्षांत या अहवालात कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर कृष्णा राघवन यांनी नोकरी कपातीची शक्यता नाकारलेल्या निवेदनाचा उल्लेख केला आहे. त्याऐवजी, त्याने कथितपणे सांगितले की Flipkart जास्त भरती टाळण्यासाठी लोकांना कामावर घेते.