2024 Bajaj Chetak Electric Launched In India: भारतात लॉन्च झाली 2024 बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
2024 Bajaj Chetak Electric (संग्रहित संपादित प्रतिमा)

2024 Bajaj Chetak Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooters) मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात 2019 मध्ये, बजाज ऑटोने (Bajaj Auto) इलेक्ट्रिक चेतक स्कूटर सादर केली. आता बजाजने 2024 चेतक दोन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे- प्रीमियम आणि अर्बेन (Premium and Urbane). कंपनीने याच्या डिझाइन आणि मेकॅनिक्समध्ये अनेक बदल केले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला बजाज ऑटोने चेतक अर्बन 2024 बाजारात लॉन्च केले. समोर आलेल्या माहितीनुसार, बजाज ऑटो चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 2024 प्रीमियममध्ये महत्त्वाचे बदल करू शकते, ज्यामुळे ते चेतक अर्बनपेक्षा वेगळे होईल.

चेतक प्रीमिअमला 3.2kWh ची बॅटरी मिळते, जी पूर्ण चार्ज केल्यावर 127 किमीची रेंज देते आणि 73 किमी/ताशी टॉप स्पीड देते. हे 800W चार्जरसह 3 तास 50 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. अर्बन व्हेरिएंट 113 किमीची रेंज देते आणि G650W चार्जरला चार्ज होण्यासाठी 4 तास 50 मिनिटे लागतात.

प्रीमियम 3 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल- इंडिगो ब्लू, ब्रुकलिन ब्लॅक आणि हेझलनट, तर अर्बन 4 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे- ट्रिम थिक ग्रे, सायबर व्हाईट, ब्रुकलिन ब्लॅक आणि इंडिगो मेटॅलिक ब्लू.

बजाज चेतकचा नवीन प्रीमियम अवतार 5-इंचाच्या डिजिटल टचस्क्रीनसह येईल. यासोबतच यामध्ये नेव्हिगेशनही देण्यात येणार असून कॉल, एसएमएस आणि म्युझिक, टायर प्रेशर मॉनिटरिंग आदी सुविधाही देण्यात येणार आहेत. ही स्कूटर 21 लिटरच्या अंडर सीट स्टोरेजसह येईल अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, बजाज चेतकच्या या नवीन अवतारात कंपनीने स्कूटरच्या परफॉर्मन्सवरही खूप लक्ष दिले आहे. त्याची टॉप स्पीड 73 किलोमीटर प्रति तास असेल, जी जुन्या मॉडेलमध्ये 63 किलोमीटर प्रति तास होती. (हेही वाचा: Tesla’s First Manufacturing Plant in India: टेस्ला गुजरातमध्ये उभारणार कार निर्मिती प्रकल्प; जानेवारी 2024 मध्ये 'व्हायब्रंट गुजरात समिट'मध्ये होणार घोषणा- Report)

टीझरनुसार, 2024 चे बजाज चेतक मॉडेल जवळपास पूर्वीसारखेच दिसेल. मात्र, कंपनीकडून काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. यात मॅट ब्लॅकसह क्रोम बेझल्स आहेत. स्कूटरला एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे. माहितीनुसार, बजाज ऑटोने जानेवारी 2020 मध्ये लॉन्च झाल्यापासून भारतात एक लाखाहून अधिक चेतक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. नवी दिल्लीतील 2024 चेतक अर्बनची किंमत 1,15,001 रुपये, तर प्रीमियमची किंमत 1,35,463 रुपये ठेवण्यात आली आहे.