Balano Car | representational purpose | Photo credits: Instagram

Maruti Suzuki New Baleno: मारूती सुझुकी आपली नवी गाडी Baleno आता नव्या ढंगामध्ये बाजारात येण्यासाठी सज्ज झाली आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मारूती सुझुकी नव्या अंदाजामध्ये गाडी बाजारात आणण्यासाठी सज्ज झाले आहेत मात्र आजपासून या कारसाठी बुकिंग सुरू करण्यात आली आहे. अवघ्या 11 हजार रूपयामध्ये या कारसाठी बुकींग सुरू करण्यात आलं आहे.  नव्या Maruti WagonR कारचं लॉन्चपूर्वीच बुकिंग सुरू, अवघ्या 11,000 रूपयांमध्ये करू शकाल बुकिंग, पहा दमदार फीचर्स आणि किंमत

2016 पासून भारतीयांच्या पसंतीच्या फॅमिली कारमध्ये बलोनो या कारचा समावेश आहे. सर्वाधिक विक्री होणार्‍या कारमध्ये या गाडीचा समावेश होतो. त्यामुळे आता अनेकांना ही कार नव्या अंदाजात कधी आणि कशी येतेय याबाबत उत्सुकता आहे.

कशी असेल नवी बलेनो कार ?

नवी बलेनो कार आत आणि बाहेरून नव्या स्वरूपात आपल्या भेटीला येणार आहे.

कारमध्ये ड्युअल एअरबॅग्स असतील

नव्या बलेनो कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा प्रकारचे इंजिन असतील. यामध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन असेल जे 83 bhp ची पावर देते,115 Nm टॉर्क देते.

1.3 लीटरचे डिझेल इंजिन 74 bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क तयार करतो.

सर्वात जलद 5 लाख युनिट विकण्याचा(38 महिने) विक्रम बलेनो कारच्या नावावर आहे.  आजतागायत  5.2 लाखाहून अधिक बलेनो कार कंपनीकडून विकण्यात आल्या आहेत.