Photo Credit- X

Sunita Williams Christmas 2024 Celebration in Space Video: सध्या जगभरात ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams)अंतराळात ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्याच्या तयारीत आहेत. सुनीता विल्यम्स गेल्या अनेक महिन्यांपासून बुच विल्मोर यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकल्या(International Space Station) होत्या. SpaceX Dragon ने अलीकडेच अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना आवश्यक वस्तूंचापुरवठा केला. ज्यामध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी काही वस्तू आणि भेटवस्तूंचा समावेश होता.

अंतराळात ख्रिसमस साजरा करण्याची तयारी

नासाने त्यांच्या 'एक्स' अकाऊंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सुनीता विल्यम्स आणि तिचे अन्य सहकारी अंतराळ स्थानकात ख्रिसमस साजरा करताना दिसत आहेत. त्यांनी तेथून जगभरातील सर्वांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. आम्ही ख्रिसमस साजरा करण्याच्या तयारीत आहोत. येथे आम्ही सातजण आहोत आणि आम्ही सर्वजण मिळून ख्रिसमस साजरा करणार आहोत.”

सुनीता विल्यम्स आणि त्यांचे क्रू मेंबर्स पृथ्वीवरून पाठवलेल्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची तयारी करत आहेत. जेणेकरून ते अवकाशात असतानाच ख्रिसमस सणामध्ये सहभागी होऊ शकतील. हे सर्व कार्गो डिलिव्हरीमुळे शक्य झाले आहे. ज्यामुळे अंतराळवीरांना अंतराळात देखील अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. ख्रिसमसच्या खास पदार्थांसोबतच, सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर त्यांच्या प्रियजनांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधतील.

नासाकडून व्हिडिओ शेअर

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळात गेले होते. मात्र त्यांच्या अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना गेले अनेक महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच थांबावे लागले. मात्र, आता तो फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे.