Maharashtra Weather: राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. वातावरणात बरेच चढ-उतार होत आहेत. कधी थंडी तर कधी कडाक्याचे ऊन तर कधी पाऊस असं राज्यातील वातावरण आहे. हवामान खात्याने 27 आणि 28 डिसेंबर रोजी गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
28 डिसेंबरला विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पहाटेपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहिल. (Pune River Dead Fish: मुळा-मुठा नदीत हजारो मृत माशांचा तरंगताना आढळला; सांडपाणी प्रकल्पाला दोष)
29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल. 30 डिसेंबरपासून पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार कामाचे नियोजन करावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.