Plane Crash In Victoria: अमेरिकेतील टेक्सास (Texas) मध्ये विमान धावपट्टीऐवजी रस्त्यावर उतरले (Plane Landed On a Road). रस्त्यावर उतरताच विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात (Accident) चार जण जखमी झाले आहेत. विमान रस्त्यावर उतरताना अनेक गाड्यांनाही धडकले. या अपघातानंतर विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दक्षिण टेक्सासमधील व्हिक्टोरिया (Victoria in South Texas) शहरातील राज्य महामार्गावर बुधवारी दुपारी ही घटना घडली.
व्हिक्टोरिया पोलिस विभागाचे उप पोलिस प्रमुख अलाइन मोया यांनी सांगितले की, परिस्थिती बिघडली नाही याचा आम्हाला आनंद आहे. लोक ठीक आहेत याचा आम्हाला आनंद आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती स्थिर असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. (हेही वाचा -US Plane Crash: अमेरिकेत विमान क्रॅश, घटनेत 2 ठार, 1 महिला जखमी)
पहा व्हिडिओ -
Plane crash in Victoria, Texas. 😮pic.twitter.com/TzkHGHI4Eb
— DramaAlert (@DramaAlert) December 12, 2024
अपघाताची चौकशी सुरू -
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, हे ट्विन-इंजिन पाइपर पीए-31 विमान होते. अपघाताच्या वेळी विमानात फक्त पायलटच होता. व्हिक्टोरिया पोलिस विभाग आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. विमानाने बुधवारी सकाळी 9.52 वाजता व्हिक्टोरिया प्रादेशिक विमानतळावरून उड्डाण केले होते. अपघात होण्यापूर्वी सुमारे पाच तास विमान हवेत होते.