Explosion at Petrol Station In Russia (PC - Twitter/@RagexWar)

Explosion at Petrol Station In Russia: रशियात एक मोठी दुर्घटना घडली असून, गॅस स्टेशनला आग (Gas Station Explosion) लागल्याने मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे 25 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. ही घटना रशियाच्या दागेस्तानी शहरातील आहे.

रिपोर्टनुसार, हायवेच्या बाजूला असलेल्या एका ऑटो रिपेअर शॉपमध्ये आग लागली आणि काही वेळात ती जवळच्या गॅस स्टेशनमध्ये पसरली. त्यामुळे गॅस स्टेशनला भीषण आग लागली. या आगीमुळे एक मजली घरही जळून खाक झाले. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. (हेही वाचा -Aircraft Collided: एअर शो दरम्यान इमारतीवर जेट कोसळले, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही)

दागेस्तानीचे गव्हर्नर सर्गेई मेलिकोव्ह यांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमींमध्ये 13 मुलांचा समावेश आहे. आग इतकी भीषण होती की आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना साडेतीन तास लागले. या आगीने 600 चौरस मीटर क्षेत्राला वेढले.