Siddhant Vitthal Patil's Dead Body Found: ग्लेशियर नॅशनल पार्क येथील रेंजर्सनी अखेर 26 वर्षीय सिद्धांत विठ्ठल पाटील याचा मृतदेह हिमस्खलनातून बाहेर काढला आहे. 6 जुलै 2024 रोजी सिद्धांत पाटील हिमस्खलनात दबला गेला होता. कॅलिफोर्नियामध्ये राहणारा टेक प्रोफेशनल सिद्धांत पाटील सात मित्रांसह पार्कमध्ये हायकिंग करत असताना हिमस्खलन खाडीत पडले. एका निवेदनात, ग्लेशियर नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिनाभराच्या शोधानंतर, ग्लेशियर नॅशनल पार्कमधील रेंजर्सना मृतदेह शोधात यश आले आहे.
अधिकारी पुढे म्हणाले, "मित्रांच्या म्हणण्यानुसार, घटने वेळी सिद्धांत पाटील यांनी परिधान केलेले कपडे सध्या तेथील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. आज सकाळी 10:30 च्या सुमारास, उद्यानातील एका पर्यटकाने हिमस्खलन खाडीत एक मृतदेह पाहिल्याची माहिती दिली. रेंजर्सनी ताबडतोब तेथे शोध मोहीम राबवली. त्या दरम्यान रेंजर्सना नेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पडलेली झाडे, मोठो दगड खडकांचा सामना करत त्यांनी पाण्यात बुडलेला मृतदेह बाहेर काढला.
एएनआयशी बोलताना सिद्धांतचे काका प्रितेश चौधरी यांनी पुष्टी केली की यूएस रेंजर अधिकाऱ्यांनी त्यांना सिद्धांतचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली होती. त्यांनी रेंजर्सच्या शोधाच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय अमेरिकन समुदायाचे नेते प्रेम भंडारी यांचेही आभार मानले, जे संपूर्ण शोधात कुटुंबाला पाठिंबा देत आहेत.
'सिद्धांतचा मृतदेह सापडल्याची माहिती यूएस रेंजर्सच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. आम्ही या दु:खाचा सामना करत असताना, हा शोध घेतल्याबद्दल आम्ही रेंजर्सचे आभार मानतो. आमच्या सतत संपर्कात असलेल्या प्रेम भंडारी यांचा विशेष उल्लेख. सिद्धांतचे अवशेष पुण्याला पाठवण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे,' असे प्रितेश चौधरी यांनी एएनआयला सांगितले.
प्रेम भंडारी म्हणाले की पार्कच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबावर ओढावलेल्या दु:खाबाबात शोक व्यक्त केला आहे. एएनआयशी बोलताना प्रेम भंडारी म्हणाले, 'जेव्हा मी पार्कच्या अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि मृतदेह मिळण्याची आशा व्यक्त केली'
ग्लेशियर नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सिद्धांत पाटील 6 जुलै रोजी ग्लेशियर नॅशनल पार्क तलावाच्या पायवाटेवर मित्रांसोबत गिर्यारोहण करत असताना ही घटना घडली. ते पायवाटेवरून जाताना मोठ्या खडकावर उभे होते . तेव्हा हिमस्खलनात खाडीत पडले. त्याच्या मित्रांनी त्याला खाडीत पडताना, पाण्यात बुडताना आणि नंतर प्रवाहात वाहून जाताना पाहिले होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'गेल्या चार आठवड्यांपासून हेलिकॉप्टरने खाडीमध्ये हवाई शोध घेतला जात आहे. घाटापासून पुलापर्यंत जमिनीवर शोध घेण्याचे प्रयत्न सुरूच होते. अनेक वेळा ड्रोनचा वापर करण्यात आला.'