6G Technology तयार करून China ने केला World Record, 5G पेक्षा 100 पट जास्त वेग, 10 हजार HD लाइव्ह व्हिडिओ केला स्ट्रीम, वाचा सविस्तर
6G Technology प्रतिकात्मक फोटो (PC - Twitter)

सध्या जगभरात 5G वर काम सुरू आहे, त्यामुळे चीनने या दिशेने एक पाऊल पुढे टाकत 6G वर काम सुरू केले आहे. त्याचवेळी 6G तंत्रज्ञानावर (6G Technology) काम करणाऱ्या चिनी संशोधकांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डेटा स्ट्रीमिंग स्पीडमध्ये नवा विक्रम केला आहे. यामुळे चीनला वायरलेस कम्युनिकेशनच्या पुढील पिढीसाठी स्पर्धात्मक फायदा मिळू शकेल. संशोधकांनी व्होर्टेक्स मिलीमीटर वेव्हजचा वापर करून एका सेकंदात एक टेराबाइट डेटा एका किलोमीटरपर्यंत पाठवला.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालात म्हटले आहे की, व्होर्टेक्स मिलिमीटर लहरी (Vortex millimeter waves) हा उच्च-फ्रिक्वेंसी रेडिओ लहरींचा एक प्रकार आहे, जो वेगाने फिरतो. सिंघुआ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एरोस्पेस इंजिनिअरिंगमधील प्राध्यापक झांग चाओ यांच्या नेतृत्वाखालील टीमने 9 फेब्रुवारी रोजी एका निवेदनात म्हटले आहे की, बीजिंग विंटर ओलंपिक (Beijing Winter Olympics) कंपाऊंडमध्ये गेल्या महिन्यात स्थापित केलेली प्रायोगिक वायरलेस कम्युनिकेशन लाइन एकाच वेळी 10,000 उपकरणांशी कनेक्ट होऊ शकते. तसेच अधिक हाय-डेफिनिशन लाइव्ह व्हिडियो फीड स्ट्रीम करू शकते.

हायपरसॉनिक शस्त्रांसाठी 6G तंत्रज्ञान आवश्यक -

टीमने असा दावाही केला आहे की, हायपरसोनिक शस्त्र 6G तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष्य शोधू शकते आणि त्यांच्याशी संवाद साधू शकते. ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट जास्त वेग असलेल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना नेटवर्कमुळे काही वेळा ब्लॅकआउटचा सामना करावा लागतो. चीनने अनेक प्रसंगी सूचित केले आहे की, ते भविष्यातील 6G तंत्रज्ञान युद्धपातळीवर वापरत आहेत.

5G पेक्षा 6G चा वेग 100 पट जास्त -

चिनी संशोधकांनी दावा केला आहे की, या प्रयोगातून असे दिसून आले आहे की चीन 6G साठी संभाव्य महत्त्वाच्या तंत्रज्ञानावरील संशोधनात जगात आघाडीवर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, चीनी शास्त्रज्ञांनी घोषित केले की त्यांनी 6G तंत्रज्ञान विकसित केले आहे. जे 5G पेक्षा किमान 100 पट वेगवान आहे. 6G संशोधकांच्या मते, हिवाळी ऑलिंपिक कंपाउंडमध्ये स्थापित प्रायोगिक वायरलेस लाइन एकाच वेळी 10,000 पेक्षा जास्त एचडी लाइव्ह व्हिडिओ फीड्स प्रवाहित करू शकते. हे एक नवीन भौतिक परिमाण सादर करण्याबद्दल आहे, जे जवळजवळ अमर्याद शक्यतांसह संपूर्ण नवीन जगाकडे नेऊ शकते.