Adult Film Star Ron Jeremy: अमेरिकन पॉर्न स्टार रॉन जेरेमी यांच्यावर 20 बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप
Ron Jeremy (Photo Credits: Getty)

Adult Film Star Ron Jeremy: अमेरिकन पॉर्न स्टार रॉन जेरेमी (Porn star Ron Jeremy) यांच्यावर 20 पेक्षा अधिक बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यातील एका प्रकरणात जेरेमी याने 15 वर्षाच्या किशोरवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. लॉस एंजिल्समधील अटॉर्नी कार्यालयाने सांगितले की, जेरेमीला सोमवार या प्रकरणी आरोपी ठरवण्यात आलं.

अमेरिकेमध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये रॉन जेरेमी यांचं मोठं नाव आहे. जेरेमी यांच्यावर जून महिन्यांमध्ये तीन महिलांवर बलात्कार आणि किशोरवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप लावण्यात आला होता. जेरेमी यांच्यावर 15 ते 54 वर्षांच्या 17 महिलांनी आरोप लावले आहेत. हे आरोप 2004 पासून ते आतापर्यंत म्हणजे 16 वर्षाच्या काळावधीमधील आहेत. (हेही वाचा - Shinzo Abe यांनी दिला जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा; 17 सप्टेंबर रोजी निवडले जातील Japan चे नवे Prime Minister)

जेरेमी यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. जेरेमी हे मागील प्रकरणातून दोषमुक्त झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून म्हटलं होतं की, 'मी स्वत: ला न्यायालयात निर्दोष ठरवण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. मला समर्थन दिल्याबद्दल सर्वांचे आभार.'

जेरेमी यांनी 2004 मध्ये लॉस एंजिल्समध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये 15 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केले होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. जेरेमी यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप जर सिद्ध झाले तर त्यांना जन्मठेप तसेच 250 वर्षांची शिक्षा होऊ शकते. जेरेमी यांनी आतापर्यंत 2 हजार पेक्षा जास्त पॉर्न चित्रपटात काम केले आहे.