रेडमी गो (Redmi Go) स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला असून आज (22 मार्च) या स्मार्टफोनचा पहिला सेल आहे. हा सेल Flipkart.com आणि mi.com वर उपलब्ध आहे. अॅनरॉईड गो ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारा शाओमीचा हा पहिला स्मार्टफोन आहे.
रेडमी गो स्मार्टफोनमध्ये 3000 एमएएच ची बॅटरी, एचडी डिस्प्ले, डेडिकेटेड मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आले आहे. तसंच यात 20 हून अधिक भारतीय भाषा सपोर्ट करतात. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट, मी डॉट कॉम आणि मी होम स्टोरवर खरेदी करु शकता. हा सेल दुपारी 12 पासून सुरु होईल. तुम्ही जर हा स्मार्टफोन खरेदी करु इच्छित असाल तर या वेबसाईटवर जावून रजिस्टर करा आणि पेमेंटच्या डिटेल्स सेलपूर्वी भरुन घ्या. त्यामुळे घाईगडबड होणार नाही.
रेडमी गो स्मार्टफोन खरेदी केल्यावर 2200 रुपयांचे जियोचे कॅशबॅक मिळत आहे आणि 100 जीबी पर्यंत फ्री डेटा मिळत आहे. फ्लिपकार्ट या स्मार्टफोन्सवर नो कॉस्ट ईएमआयची ऑफर देत आहे आणि एक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डवर 5% अतिरिक्त डिस्काऊंट मिळत आहे.
Redmi Go फिचर्स:
रेडमी गो स्मार्टफोन अॅनरॉईड 8.1 ओरिओ (गो एडिशन) वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर देण्यात आले आहे. यात 1 जीबी रॅम आणि एडरिनो 308 जीपीयू देण्यात आले आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनला 8 जीबी स्टोरेज वेरिएंटसह बाजारात सादर करण्यात आला आहे. यात 128 जीबी स्टोरेज देण्यात आला असून मायक्रो एसडी कार्ड च्या साहाय्याने तुम्ही स्टोरेज अधिक वाढवू शकता.
रेडमी गो स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅश उपलब्ध आहे. तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून 4जी वोएलटीई, वायफाय, ब्लुट्युथ, जीपीएस, मायक्रो युएसबी आणि 3.5 एमएमचा ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 3000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.