Instagram वर फॉलोअर्स वाढवायचेत? मग जाणून घ्या 'या' सोप्या आणि महत्वाच्या टिप्स

हल्ली सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण सोड=सोशल मिडियाचा वापर करत असतात. हल्ली कोणाच्या मोबाईलमध्ये चांगला फोटो काढला गेला तर तर सर्वात आधी इस्टाग्राम (instagram) या सोशल प्लेटफार्म वर शेअर केला जातो. सोशल मिडीयाच्या प्लॅटफॉर्म मध्ये इंस्टाग्राम एवढे लोकप्रिय आहे की तिथे फॉलोवर्स वाढवण्यासाठी लोक पैसे ही खर्च करतात. तुम्हाला पण जर तुमचे इंस्टाग्रमवरचे फ़ॉलोअर्स वाढवायचे असतील तर जाणून घ्या काही महत्वाच्या टिप्स. (Happy New Year 2021 Wishes And Messages: नववर्ष 2021 च्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Stickers, GIFs कसे डाऊनलोड कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स )

आकर्षक बायो

आपण आपल्या प्रोफाइलवर आकर्षक गोष्टी लिहिल्या पाहिजेत जरतुमचे ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेल असेल तर आपल्यासाठी इन्स्टाग्राम एक चांगले व्यासपीठ आहे. आपण आपल्या प्रोफाइलमध्ये आपल्या ब्लॉगवर किंवा यूट्यूब चॅनेल लिंक देखील जोडू शकता जेणेकरून जेव्हा कोणी आपल्या प्रोफाइला भेट देते तेव्हा ती व्यक्ती आपल्याला दिलेल्यालिंकवर क्लिक करुन आपल्या चॅनेल आणि ब्लॉगला देखील भेट देऊ शकते.

चांगल्या पोस्ट

आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की आपण ज्यासाठी आपण इंस्टाग्राम प्रोफाईल तयार केले आहे त्याच्याशी संबंधित पोस्ट तुम्ही अपलोड करता.तुम्ही दररोज तुमच्या प्रॉफाईलशी शी निगडित गोष्टी पोस्ट करायला हव्यात.

हॅशटॅग

ज्यावेळी तुम्ही एखादी पोस्ट अपलोड करता तेव्हा हॅशटॅगचा वापर जरुर करा. कारण तुमच्या हॅशटॅगवरुन लोक तुमची पोस्ट पाहू शकतात. पण उगाचच भरमसाठ हॅशटॅग देणे टाळा.याच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढू शकते.

एक्टिव्ह रहा

इंस्टाग्रामवर जास्तीत फॉलोअर्स मिळवण्यासाठी तुम्ही जास्त एक्टिव्ह असणे आवश्यक आहे. त्यासाठी फक्त नियमित पोस्ट टाकणे पुरेसे नाही. आपल्याला जास्तीत जास्त पोस्ट लाइक्स आणि कमेंट्स देखील आवश्यक आहेत. हे आपण किती एक्टिव्ह आहात हे दर्शविते.

ट्रेन्डिंग पोस्ट

नेहमीच ट्रेन्डिंग पोस्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. तसेच जर तुमची ही ट्रेन्डिंग पोस्ट व्हायरल झाल्यास तुम्हाला तेथून सुद्धा अधिक फॉलोअर्सची संख्या मिळू शकते.

प्रोफाईल ला शेअर करा 

तुमच्या इंस्टाग्राम अकॉउंट ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ते जास्तीत जास्त शेअर करणे गरजेचे आहे.यासाठी तुम्ही तुमचे बाकीचे  सोशल मिडिया अकाउंट जसे फेसबुक चा वापर करू शकता.

इंस्टाग्राम टूल्स

तुम्ही 'क्रोडफायर' नावाचे अ‍ॅप्लिकेशन वापरू शकता.ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पोस्ट शेड्यूल करूँ ठेऊ शकता. पोस्ट करण्यासाठी योग्य वेळजेव्हा आपण इन्स्टाग्रामवर कोणतीही पोस्ट अपलोड करत असाल, तेव्हा आपण योग्य वेळी पोस्ट केल्याची काळजी घ्यावी जेणेकरून आपले पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल.

वर दिलेल्या काही सोप्या आणि महत्वाच्या टिप्स चा वापर करुन तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाइलचे फॉलोअर्स वाढवू शकता.तेव्हा या टिप्स चा नक्की वापर करायला सुरुवात करा.