आता पोलिस स्टेशनला न जाताही तुम्ही गुन्हा दाखल करु शकता. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही सोय नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी पोलिसांनी 'यूपी कॉप अॅप' दाखल केले आहे. या अॅपवरुन तुम्ही एफआयआर (FIR) दाखल करु शकता. या अॅपद्वारे तुम्ही गाडीची चोरी, सामान चोरी, मोबाईल चोरी, मुलं पळवण्याची घटना तसंच सायबर गुन्हे यांची तक्रार नोंदवू शकता.
उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओमप्रकाश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली यूपी कॉप अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच या अॅपबद्दल लोकांच्या प्रतिक्रीया घेण्याचे कामही सुरु आहे. अनेकदा चोरी झाल्यावर लोक पोलिस स्टेशनला जाण्यास घाबरतात. तर काहींना पोलिस स्टेशनला जावून तक्रार दाखल करण्यास वेळच नसतो. नागरिकांच्या या समस्या लक्षात घेऊन या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
अॅपद्वारे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी असलेली एफआयआर प्रत ई-मेलवर उपलब्ध करून दिली जाईल.