Tik Tok video app (Photo credit: Wiki Commons)

भारतामध्ये काल केंद्र सरकारने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी जाहीर केल्यानंतर आज अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर (Apple's App Store) आणि गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) मधून टिकटॉक ( TikTok ) हटवण्यात आले आहे. दरम्यान काल जाहीर केलेल्या 59 अ‍ॅप्सच्या यादी मध्ये Helo, Likee सह TikTok या व्हिडिओ अ‍ॅपचादेखील समावेश होता. दरम्यान या चीनी अ‍ॅप्समुळे राष्ट्रीय सुरक्षेला बाधा निर्माण होत असल्याचं कारण पुढे करण्यात आलं आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून भारत-चीन संबंध ताणले गेले आहेत. India Bans Chinese Mobile Apps: भारत सरकारने घातली TikTok, UC Browser, Shareit सह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; जाणून घ्या संपूर्ण यादी.

अ‍ॅपल, गूगल अ‍ॅप स्टोअरवरून टिकटॉक हटवल्याची माहिती प्रसिद्ध होताच काही वेळातच टिक टॉक इंडियाकडून देखील आपली बाजू मांडण्यात आली आहे. युजर्सचा डाटा सुरक्षित असून आम्ही काही वेळातच सरकार सोबत चर्चा करणार आहोत. आम्हांला आमची बाजू मांडायला वेळ देण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले आहे. टिकटॉक या लोकप्रिय व्हिडिओ अ‍ॅपची भारतामध्ये धूम होती. त्याचे सुमारे 200  मिलियन युजर्स देशामध्ये आहेत.

TikTok India Tweet  

दरम्यान बंदी आणलेल्या 59 चीनी अ‍ॅप्समध्ये CamScanner, UC Browser, Shareit, WeChat आणि Clash of Kings सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. ही अ‍ॅप अजूनही प्ले स्टोअर, अ‍ॅप स्टोअरवर उपालब्ध आहेत. त्यांना हटवण्यासाठी अद्याप कोणतीही टाईमलाईन जारी करण्यात आलेली नाही.

काल केंद्र सरकारने चीनशी संबंधित अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णयामागे लडाख मध्ये  लाईन ऑन कंट्रोल जवळ भारतीय सैन्यावर केलेल्या हिंसक झडपीची पार्श्वभूमी आहे.  या घटनेनंतर गलवान खोर्‍यात तणावाचं वातावरण आहे तर देशातही संतापाची लाट आहे.