TCS New Policy: देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी TCS ने आपले धोरण कडक केले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयातून काम करण्याचे आदेश दिल्यानंतर आलेल्या ताज्या पॉलिसी अपडेटनुसार, 60 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असणारे त्रैमासिक व्हेरिएबल वेतनासाठी पात्र होणार नाहीत. सूत्रांनी मनीकंट्रोलला सांगितले की, TCS ने अलीकडेच या बदलांबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती देणाऱ्या अंतर्गत HR पोर्टलवर आपले धोरण अपडेट केले आहे. 17 एप्रिल रोजी सुधारित अद्ययावत धोरणानुसार, TCS ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 85 टक्के किंवा त्याहून अधिक आहे त्यांनाच पूर्ण बोनस देईल. उपस्थिती ८५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास कर्मचाऱ्यांचा बोनस कापला जाईल.
हजेरीनुसार बोनस दिला जाईल या अद्ययावत धोरणानुसार, जे कर्मचारी आठवड्यातून 4 किंवा अधिक दिवस कार्यालयात येतात त्यांना 100 टक्के परफॉर्मन्स बोनस दिला जाईल. याशिवाय ७५ ते ८५ टक्के उपस्थिती असलेल्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के परफॉर्मन्स बोनस मिळेल. 60 ते 75 टक्के उपस्थिती असणाऱ्यांना 50 टक्के परफॉर्मन्स बोनस दिला जाईल. ६० टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्यांना बोनस दिला जाणार नाही.
60 ते 75 टक्के उपस्थिती असणाऱ्यांना 50 टक्के परफॉर्मन्स बोनस दिला जाईल. ६० टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्यांना बोनस दिला जाणार नाही. म्हणून, कंपनीने कार्यालयातील कामाला वेरियेबल वेतन किंवा बोनसशी जोडले आहे. कंपनीच्या अंतर्गत मेमोमध्ये असे म्हटले आहे की जे कर्मचारी 85 टक्के किंवा त्याहून अधिक उपस्थिती गांभीर्याने घेत नाहीत त्यांच्या विरोधात देखील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.