प्रोफेशनल कॅमेरा फोन Sony Xperia Pro-I लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Sony Xperia Pro-I (Photo Credits-Twitter)

Sony Xperia Pro-I लॉन्च करण्यात आला आहे. हा एक प्रोफेशनल कॅमेरा फोन असणार आहे. यामध्ये 1 इंचाचा कॅमेरा सेंसर मिळणार आहे. जो RX100 VII कंपनीने दिला आहे. गुगल पिक्सल 6 प्रो मध्ये 1.2µm चा पिक्सल दिला गेला आहे. तर सोनी एक्सपिरिया प्रो-I स्मार्टफोनमध्ये 2.4µm चा पिक्सल दिला आहे. जो लो-लाइट मध्ये सुद्धा शानदार फोटो क्लिक करण्यास मदत करणार आहे. त्याचसोबत 12-bit RAV फाइल्स आणि 120 फ्रेम पर सेकंदात 4K व्हिडिओ शूट करु शकतो. त्याचसोबत आय डिटेक्शन ऑटो फोकससह येणार आहे. सोनी एक्सपिरिया प्रो-I ची टक्कर Google Pixel 6 Pro आणि Mi 11 Ultra सोबत होणार आहे.

सोनी एक्सपिरिया प्रो-I सिंगल ऑप्शन 12GB रॅम आणि 512GB मध्ये येणार आहे. याची किंमत 1799 डॉलर आहे. फोनची प्री ऑर्डर येत्या 28 ऑक्टोंबर पासून सुरु होणार आहे. तर विक्री डिसेंबर महिन्यापासून सुरु होणार आहे. सोनी एक्सपिरिया प्रो-I स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होणार याबद्द्ल खुलासा करण्यात आलेला नाही.(Flipkart Big Diwali Sale 2021: फ्लिपकार्ट कडून पुन्हा एकदा 'बिग दिवाळी सेल'ची घोषणा, 28 ऑक्टोबर पासून होणार सुरू)

Sony Xperia Pro-I  मध्ये 6.5 इंचाचा 4K OLED डिस्प्ले दिला गेला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि ऑस्पेक्ट रेश्यो 21:9 आहे. फोनमध्ये Snapdragon 888  प्रोसेसर दिला गेला आहे. जो 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेजसह येणार आहे. फोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित सिस्टिमवर काम करणार आहे. त्याचसोबत मेमोरी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येणार आहे. फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. सोनी एक्सपिरिया प्रो-I मध्ये 4500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. यामध्ये फुल चार्जिंगमध्ये सिंगल डे बॅटरी लाइफ मिळणार आहे. फोन 30W पॉवर एडाप्टरसह येणार आहे. फोनमध्ये Dolby Atmos सपोर्ट असणारे स्टेरिओ स्पीकर्स दिले गेले आहेत. सोनी एक्सपिरिया प्रो-I मध्ये 3.5mm हेडफोन जॅक दिला गेला आहे.