Samsung Galaxy M42 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोनची किंमत
Samsung Galaxy M42 5G (Photo Credits: Samsung India)

सॅमसंगने गॅलेक्सी सिरीजचा (Samsung Galaxy Series) विस्तार करत आज भारतीय बाजारात (Indian Market) एक नवा 5जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 42 5जी (Samsung Galaxy M42 5G) असे या स्मार्टफोनचे नाव असून यात दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. मोबाईल क्वाड रियर कॅमेरा सेटअप (Quad-Camera Setup), सुपर एमोलेड डिस्प्ले आणि नॉक्स सिक्युरिटी (Knox Security) देण्यात आले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये सॅमसंग पे (Samsung Pay) यांसारखे फिचर्स देखील मिळतील. सॅमसंग गॅलेक्सी एम 42 स्मार्टफोन मध्ये 5000 एमएएच ची बॅटरी देखील देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी सिरीज या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+सुपर एमोलेड इनिफिनटी-यू डिस्प्ले देण्यात आला आहे. या मोबाईल अॅनरॉईड 11 वर आधारित वन यूआय 3.1 वर काम करतो. हा स्मार्टफोन 15 वॉट फास्ट चार्गिंग सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी एम 42 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेट्प देण्यात आला आहे याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. यासोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिगंसाठी 20 MP चा कॅमेरा दिला आहे.

Samsung India Tweet:

सॅमसंग गॅलेक्सी एम 42 दोन रंगात उपलब्ध आहे. प्रिज्म डॉट ब्लॅक आणि प्रिज्म डॉट ग्रे. हा स्मार्टफोन दोन मेमरी वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे. यात 6 जीबी+1208 जीबी आणि 8 जीबी + 128 जीबी वेरिएंटची किंमत अनुक्रमे 21,999 आणि 23,999 रुपये इतकी आहे.

या स्मार्टफोनचा सेल 1 मे पासून सुरु होत आहे. या दिवशी या हँटसेटचा सेल इंटरोडक्टरी प्राईजने होईल. त्यामुळे या दिवशी ग्राहक 6 जीबी रॅम वेरिएंट 19,999 रुपये तर 8 जीबी वेरिएंट 21,999 रुपयांना खरेदी करु शकतात. या स्मार्टफोन सेल 1 मे पासून अॅमेझॉन, सॅमसंग इंडिया यांच्या अधिकृत वेबसाईट सॅमसंग डॉट कॉम आणि निवडक रिटेल स्टोर्स मध्ये उपलब्ध असेल.