खुशखबर! Reliance Jio चा धमाकेदार Global ISD प्लान, 501 रुपयात मिळणार 551 चा टॉकटाईम
Reliance Jio (Photo Credit-Wikimedia Commons)

लॉकडाऊन एकमेकांपासून बरेच मैल दूर असलेल्या आपल्या आप्तलगांच्या संपर्कात राहण्यासाठी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने एक जबरदस्त प्लान आणला आहे. हा प्लान तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी वापरु शकता. मुख्य म्हणजे या प्लानमध्ये 501 रुपयांत तुम्हाला 551 रुपयांचा टॉकटाईम मिळत आहे.हा Global ISD Pack प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते. लॉकडाऊनच्या काळात जगभरात असलेल्या आपल्या माणसांसोबत जोडले राहावे यासाठी हा प्लान आणण्यात आला आहे.

याशिवाय या वेबसाइटवर वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे कॉल रेट्स ठरविण्यात आले आहे. येथे तुम्हाला सर्व देशांचे कंट्री कोड सुद्धा मिळतील. जर तुम्हाला ग्लोबल आयएसडी प्लान खरेदी करायचा नसेल तर तुम्ही स्वस्त कॉल रेट्सचा लाभ घेऊ शकता.

हेदेखील वाचा- रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म मध्ये अमेरिकन Vista Equity Partners ची गुंतवणूक; 11,367 कोटी रूपयांचा व्यवहार

याशिवाय कंपनीचे अनेक रोमिंग प्लान्स आहेत. ज्यात 575 पासून 5,751 रुपयांपर्यंत प्लान्सचा समावेश आहे.

रिलायन्स जिओ लवकरच त्यांचे व्हिडिओ कॉलिंग अॅप Jio Meet लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. हे अॅप Zoom, Google Meet, Hangout, Duo सारख्या व्हिडिओ सारख्या कॉलिंग अॅपला टक्कर देणारे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच फेसबुकने रिलायन्स जिओबरोबर भागीदारी केली आहे. जिओ मीट कॉलिंग अॅप लॉन्च करण्यामागे एक कारण असू शकते.