कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जरी जाहीर केला असला तरी इतका वेळ घरात बसून नेमकं करायचं काय? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर त्यातला काही वेळ मज्जा मस्ती करत घालवण्यासाठी गूगल या जगातील आघाडीच्या सर्च इंजिनने 'Stay and Play at Home with Popular Past Doodles'ही सीरीज लॉन्च केली आहे. गूगल त्यांच्या डूडल सीरीजमध्ये काही खेळ डूडलच्या माध्यमातून पुन्हा रसिकांसाठी उपलब्ध करून देत आहे. आणि आज या सीरीजमधला खेळ आहे PAC-MAN!
एक मॉन्स्टर पॅक मॅन खात खात चक्रव्युहातून कसा बाहेर पडू शकतो. यावर हा सारा खेळ आहे. 1980 साली आलेला हा गेम जपान सह जगभरात सुपरहीट ठरला होता. त्यावेळेस world's most successful arcade game म्हणून गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद करण्यात आली होती.
पॅक मॅन खेळामध्ये चक्राव्युहासारख्या स्थितीमध्ये सारे डॉट्स खात खात तुम्हांला पुढे जायचं आहे पण वाटेत तुम्हांला Blinky, Pinky, Inky आणि Clyde या वेगवेगळ्या शत्रूंचा सामना देखील करावा लागणार आहे. तुम्ही जसजसे पुढे जाल तशी या खेळाची कठीण होण्याची स्थिती वाढणार आहे. 2010 साली गूगलने या खेळासाठी खास डूडल बनवलं होतं. दरम्यान 21 मे 2010 साली या खेळाची 31 वी वर्षपूर्ती देखील सेलिब्रेट करण्यात आली होती.
गूगलने मागील दहा दिवसांमध्ये कोडिंग, क्रिकेट, फ़िशिंगर, रॉकमोर आणि गार्डन नोम, लोतेरिआ, हॅलोविन,हिप हॉप सारखे खेळ उपलब्ध करून दिले आहेत. दरम्यान कोरोनाच्या संकटात गूगल देखील त्यांच्याकडून या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. सुरूवातील त्यांनी कोरोना संकटाबाबात जनजागृती करण्यासाठी, कोव्हिड योद्धांना मानवंदना म्हणून विशेष सीरीज केली होती.