Oppo Reno 4 Pro: MS Dhoni च्या चाहत्यांसाठी लॉन्च झाला ओप्पोचा नवा स्मार्टफोन; 'एमएस धोनी'च्या नावासह छापलेला आहे ऑटोग्राफ, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Oppo Reno 4 Series Launched (File Photo)

ओप्पोने (Oppo Reno 4 Pro) आपला नवीन फोन रेनो 4 प्रोचा आणखी एक प्रकार लॉन्च केला आहे. हा नवीन प्रकार गॅलॅटिक ब्लू कलरमध्ये आला आहे. आपण जर का क्रिकेटर एमएस धोनीचे (MS Dhoni) चाहते असाल, तर आपल्यासाठी या फोनमध्ये एक खास सरप्राईज असणार आहे. या फोनवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ऑटोग्राफ आहे. कंपनीने फोनच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये आणि किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. फोनची किंमत 34,990 रुपये आहे, जी त्याच्या 8 जीबी + 128 जीबीची किंमत आहे.

एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ओप्पोने बॉक्स पुन्हा डिझाइन केला आहे आणि फोनच्या मागील बाजूस त्याच्या ऑटोग्राफसह महेंद्रसिंग धोनी असे लिहिले आहे. 24 सप्टेंबरपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ओप्पो रेनो 4 प्रो मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे. ओप्पोचा हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो, ज्याच्या वर कंपनीचा कलर OS 7.2 देण्यात आला आहे.

कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर या ओप्पो स्मार्टफोनमध्ये अपर्चर एफ/1.7 सोबत 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे, अपर्चर एफ/2.2 सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे. फ्रंटमध्ये अपर्चर एफ/2.4 च्या सोबत 32 मेगापिक्सलचा सोनी IMX616 सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीसाठी, फोनमध्ये 4000mAh बॅटरी आहे, जी 65 W च्या SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंगसह येते. (हेही वाचा: iPhone SE खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी, कंपनीकडून दिला जातोय भारी डिस्काउंट)

दरम्यान, सध्या आयपीएलचा हंगाम सुरु आहे. एमएस धोनी चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. अशात धोनीने नुकताच चिनी मोबाईल कंपनी 'ओपो' सोबत करार केला.