Oppo A54 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Oppo A33 smartphone (Photo Credits: Oppo)

Oppo कंपनीने त्यांचा मिड बजेट सेगमेंट मधील नवा स्मार्टफोन Oppo A54 लॉन्च केला आहे. जो गेल्या वर्षात Oppo A53 चे अपग्रेडेड वर्जन आहे. ओप्पो ए54 मध्ये युजर्सला ट्रिपल  रियर कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे.या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ऑप्टिमाइज्ड चार्जिंग फिचरचा वापर केला आहे. जो फोन ओव्हरचार्ज करत नाही. सध्या कंपनीने हा स्मार्टफोन इंडोनेशियात लॉन्च केला गेला आहे. अन्य देशातील लॉन्चिंग संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.

या स्मार्टफोनच्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास तो सिंगल स्टोरेज वेरियंटमध्ये दिला गेला आहे. यामध्ये 4GB+128GB स्टोरोज मिळणार आहे. याची किंमत जवळजवळ 13,600 रुपये आहे.  हा स्मार्टफोन Crystal Black आणि Starry Blue कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ओप्पो ए54 अॅन्ड्रॉइड 10Os वर आधारित आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 चिपसेटवर काम करणार आहे. यामध्ये 720X1600 पिक्सल स्क्रिन रेज्यॉल्यूशनसह 6.51 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. जो 60Hz रिफ्रेश रेट, 89.2 टक्के स्क्रिन टू बॉडी रेश्यो आणि 269ppi  पिक्सल डेंसिटीसह येणार आहे. Oppo चा हा स्मार्टफोन सिंगल स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. ज्या मध्ये युजर्स मायक्रोएसडीचा वापर करुन 256GB पर्यंत वाढवू शकतात.(Realme C20, Realme C21 आणि Realme C25 ची लाँच डेट आली समोर, पाहा कुठे होणार लाईव्ह इव्हेंट)

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा दिला गेला आहे. फोनमध्ये प्रायमरी सेंसर 13MP चा आहे. तर 2MP चा मॅक्रो शॉट आणि 2MP चा बोहक इफेक्ट दिला गेला आहे.  या व्यतिरिक्त व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी युजर्सला 16MP चा फ्रंट कॅमेऱ्याची सुविधा मिळणार आहे. मिड बजेट रेंज मधील हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.