Lok Sabha Election 2019 Results: मतमोजणीचा निकाल आता तुमच्या हाती; या App द्वारे जाणून घ्या कोणत्या उमेदवाराला मिळाली किती मते
Mobile Phone (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

देशातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2019) संपल्या आहेत. आता प्रतीक्षा आहे ती रिझल्टची. रविवारी पाहायला मिळालेल्या एक्झिट पोलनुसार (Exit Poll) परत एकदा भाजप (BJP) पक्ष सत्तेत येणार आहे. उद्या निवडणुका आयोगाची वेबसाईट, विविध वाहिन्या रिझल्टचे प्रक्षेपण करतील. मात्र प्रत्येकालाच टीव्हीसमोर बसून राहणे अथवा वेबसाईट चेक करत राहणे शक्य नाही. यासाठी पोल वॉचडॉग (Poll Watchdog) ने 'व्होटर हेल्पलाइन' (Voter Helpline) नावाचे एक अॅप सादर केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही मतमोजणी संदर्भातील प्रत्येक गोष्टीची माहिती तुमच्या मोबाईलवर पाहू शकता.

उद्या, 23 मे रोजी मोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्या क्षणापासूनचे अपडेट्स आपल्याला या अॅपमध्ये मिळू लागतील. आपल्याला एखाद्या विशिष्ट उमेदवाराची मते जाणून घ्यायची असतील तर तीही सुविधा यामध्ये उपलब्ध असणार आहे. तुम्ही हा उमेदवार बुकमार्क म्हणून सेव्ह करू शकता, जेणेकरून या उमेदवाराच्या मताचा आकडा तुम्हाला समजत जाईल. (हेही वाचा: निवडणूकीचे संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी पाहावी लागणार शुक्रवार पहाटेपर्यतची वाट?)

याबाबत बोलताना, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत निवडणूक आयोगाने अशी 12 डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. यातील सहा उमेदवारांसाठी आहेत तर सहा मतदारांसाठी. त्यापैकी नागरिकांना एमसीसीसीच्या  (MCC) उल्लंघनांबद्दल तक्रार करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सीव्हीजील (cVigil) अॅप तयार करण्यात आले आहे. 19 मे पर्यंत यावर 1,40,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत. याशिवाय आयोगाने असे एक मतदान मॉनिटरिंग डॅशबोर्ड विकसित केले आहे, जे मतदान केंद्रवर घडत असलेला डेटा आणि माहिती काढेल, आणि लोकांना घडत असलेल्या गोष्टींबाबत अपडेटेड ठेवेल.