Infosys building. (Photo Credit: Wikimedia Commons)

भारतातील सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसने (Infosys) कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करण्यास सांगितले होते. पंरतू आता हे वर्क कल्चर (Work Culture) बदलणार असून कर्मचाऱ्यांना रोज कार्यालयात जावे लागणार आहे.  तसेच रोज कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे.   इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी उत्पादकता आणि आर्थिक वाढीसाठी कर्मचार्‍यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याची गरज वारंवार नमूद केल्यावर वर्क फ्रॉम होम (Work from Home) हे बंद करण्यात आले आहे.  (हेही वाचा -  TCS ला अमेरिकन फेडरल कोर्टाचा मोठा झटका; 1800 कोटी देण्याचे आदेश)

एका रिपोर्ट्सनुसार या अगोदर कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितले होते. परंतु याला कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे इन्फोसिसने म्हटले आहे की, कोविड -19 च्या आजारानंतर तीन वर्षे घरातून काम काम करणे पुरेसे होते. आता कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम ऑफिस करणे गरजेचे आहे.

विप्रोनेही आपल्या कर्मचाऱ्यांना तीन दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितले होते आणि तसे न केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे.  तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने देखील कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमधून काम करण्यास सांगितले आहे.