गूगल असिस्टंट मराठी भाषेत कसा वापराल ?

स्मार्टफोन आता  केवळ चैनीची गोष्ट राहिली नाही. स्मार्टफोनचा योग्य पद्धतीतीने वापर केल्यास  आपली अनेक काम झटपट होऊ शकतात. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून युजर्सना अनेक गोष्टी सोप्या करून देण्याचं काम अनेकजण करत आहेत. गुगलनेही आता आर्टिफिशियल टेक्नोलॉजीचा वापर करत गूगल असिस्टंट ही सोय मराठीत उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे इंग्रजी, हिंदी प्रमाणे आता मराठीतही गूगल असिस्टंटची सोय खुली करण्यात आली आहे. अँड्रॉईड ६.० किंवा ७. ० असणाऱ्या मोबाईलमध्ये ही सोय उपलब्ध होणार आहे.

गूगल असिस्टंट कोणती कामं करणार ?

गूगल सर्च इंजिनवर माहिती शोधणं, हवामान पाहणं , गाणी लावणं,  मोबाईलमध्ये अलार्म लावणं, प्रश्नांची उत्तर शोधणं, sms पाठवणं या गोष्टी सोप्या होणार आहेत.

काय करावे लागेल?  

तुम्हांला सारी माहिती मराठी हवी असल्यास तुमच्या स्मार्टफोनमध्ये संबंधित बदल करावे लागणार आहेत.

प्ले स्टोअर ओपन करा. त्यामध्ये गूगल टाईप करा. सामान्यपणे मोबाईलमध्ये गूगल इंस्टॉल असत. मात्र ते पेज थोडं स्कोल करा

Become a beta teaster या पर्याया खाली  i am in क्लिक करा.

बीट व्हर्जन साईन अप होण्यासाठी काही वेळ लागतो.  त्यानांतर मोबाईल मध्ये क्रोमा ब्राऊझर ओपन  करा.

त्यामध्ये गूगल  प्ले सर्व्हिसेस वर क्लिक करा.  खाली i am in हा पर्याय दिसल्यानंतर बिकम ए टेस्टर वर क्लिक करा.

फोनचं होम स्क्रीन बटण दाबून ठेवा. त्यानंतर गूगल असिस्टंट ओपन होईल.

  1. Setting Devices मध्ये जा आणि तुमचा फोन निवडा
  2. Assistant language निवडा आणि मग language preferences मध्ये जा
  3. Add language निवडून इथे मराठी (Marathi) निवडा
  4. मुख्य भाषा मराठी निवडल्यानंतर गुगल असिस्टंट मराठीत बोलू शकतो.
  5. Ok google  बोलून मराठीत बोलायला सुरुवात करा.