Instagram (Photo Credits: Instagram)

इंस्टाग्राम (Instagram) हे सोशल मीडियाचे लोकप्रिय माध्यमं. इंस्टाग्रामची भूरळ न पडली नाही तर नवलंच. त्यावरील फोटोज (Photos), व्हिडिओज (Videos), स्टोरीज (Stories) लक्षवेधी ठरतात आणि ते डाऊनलोड करण्याची इच्छा होते. अशावेळी ते नेमकं करायचं कसं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ते अगदी सोपे आहे. परंतु, त्यासाठी फोटो, व्हिडिओ असणाऱ्या व्यक्तीची तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. कारण फेसबुक, इस्टाग्रामवरील पोस्ट तुम्ही थेट डाऊनलोड करु शकत नाही. तसंच इंस्टाग्रामवरील केवळ पब्लिक अकाऊंट वरुन तुम्हाला पोस्ट, फोटोज, व्हिडिओज डाऊनलोड करता येतील, प्रायव्हेट अकाऊंटवरुन तो पर्याय उपलब्ध नाही. तर जाणून घेऊया इंस्टाग्रामवरुन फोटोज, व्हिडिओज आणि स्टोरीज डाऊनलोड करण्याची पद्धत:

# Ingramer.com ला भेट द्या आणि Hamburger icon वर क्लिक करा.

# 'Tools'वर क्लिक करुन 'Instagram Downloader' वर टॅब करा.

# आता जेथून फोटो डाऊनलोड करायचा आहे त्या इंस्टा अकाऊंटवर जा. त्यानंतर उजव्या बाजूच्या वर असलेल्या तीन डॉट आयकॉन वर क्लिक करा.

# परत इंस्टाग्राम वेबसाईटवर जा. 'Download Photo'वर क्लिक करा. कॉपी केलेली लिंक पेस्ट करा आणि सर्च वर क्लिक करा. खाली फोटो दिसेल. त्यानंतर 'Download' वर क्लिक करा.

# अशाप्रकारे इंस्टाग्राम अकाऊंटवरील व्हिडिओज डाऊनलोड करता येतील. कॉपी केलेली लिंक पेस्ट करुन सर्च करा आणि 'Download Video' वर क्लिक करा.

# स्टोरीज डाऊनलोड करण्यासाठी Ingramer.com वरील 'Download Stories' वर क्लिक करा आणि जेथून स्टोरी डाऊनलोड करायची आहे ते इंस्टाग्राम अकाऊंट युजरनेम इंटर करा.

# त्यानंतर त्या इंस्टाग्राम अकाऊंटची लेटेस्ट स्टोरी तुम्हाला खाली दिसेल. तसंच जुने हायलाईट्सही दिसतील. हव्या असलेल्या फोटो खालील 'Download' पर्यायावर क्लिक करा.

दरम्यान, इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. तुम्हालाही ही इच्छा नक्कीच असेल. त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. त्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामच्या माध्यमातून मित्रपरीवाराशी कनेक्टेड राहणे, सेलिब्रिटींना फॉलो करणे सहज सोपे आहे. सध्या इंस्टाग्रामचे 1 बिलियन युजर्स आहेत.