Android Q Beta Version Rolled on some Google Pixel Devices (Photo Credits: Twitter)

गुगलची नवी अॅनरॉईड Q (Android Q) ही ऑपरेटींग सिस्टम युजर्ससाठी सुरु झाली आहे. याचे बीटा व्हर्जर लॉन्च करण्यात असून हा अपडेट गुगल पिक्सल डिव्हाईसमध्ये सादर करण्यात आले आहे. पिक्सल 2, पिक्सल 2XL, पिक्सल 3, पिक्सल 3XL या स्मार्टफोन्समध्ये सादर करण्यात येतील. तुम्ही देखील पिक्सल स्मार्टफोनचा वापर करत असाल तर अॅनरॉईड Q अपडेट करु शकता. मात्र हे अपडेट करण्यापूर्वी डेटा बॅकअॅप घेणे गरजेचे आहे.

तर जाणून घेऊया अॅनरॉईड Q डाऊनलोड आणि इंस्टॉल करण्याची पद्धत:

# सर्वप्रथम google.com/android/beta या साईटवर जा.

# यानंतर अॅनरॉईड बीटा प्रोग्रॅमसाठी एनरोल करा.

# एनरोल झाल्यानंतर युजर्सला एक नोटीफिकेशन येईल. यात तुम्ही सिस्टम अपडेटसाठी तयार आहात का? असे विचारले जाईल.

# त्यानंतर तुम्हाला इंस्टॉलचा ऑप्शन देण्यात येईल. इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला स्मार्टफोन रीसेट करावा लागेल.

# त्यानंतर फोन रिस्टार्ट केल्यावर तुम्ही अॅनरॉईड Q या नव्या ऑपरेटींग सिस्टमचा आनंद घेऊ शकता.

# जर तुम्हाला अॅनरॉईड Q पसंतीस पडला नसेल आणि तुम्ही जुन्या ऑपरेटींग सिस्टमवर जावू इच्छित असाल तर तुम्ही त्या वेबसाईटवर जावून 'ऑप्ट ऑउट' या ऑप्शनवर क्लिक करा. मग पुढील 24 तासात तुम्हाला एक अपडेट येईल. हा अपडेट इंस्टाल करुन तुम्ही तुमच्या जुन्या ऑपरेटींग सिस्टमचा आनंद घेऊ शकाल.

Android Q बीटा:

या नवीन बीटा Android Q मध्ये सिस्टम अॅप्सचे फिचर्स अपडेट करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रायव्हसी आणि सुरक्षितता याचा विचार करुन नवीन सेफ गार्डचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डेटा शेअरिंग, कनेक्टीव्हीटी, मीडिया आणि फिंगरप्रींट सेंसर यांची गुणवत्ता सुधारण्यात आली आहे. तसंच यात अजून काही अपडेटेड फिचर्स अॅड करण्यात आले आहेत.