तुम्ही बीएसएनएल (BSNL) किंवा एमटीएनएल (MTNL) युजर्स आहात का? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. टेलीमार्केटिंग कॉलने (Telemarketing call) त्रस्त असणारे अनेक मोबाईल युजर्स आहेत. तुम्ही महत्त्वाच्या कामात गुंतलेले असतानाच हे कॉल्स तुम्हाला बरेचदा त्रासदायक ठरतात. पण तुमचा हा त्रास अगदी सहज दूर होऊ शकतो.
यासाठी तुम्हाला 'डू नॉट डिस्टर्ब' (DO NOT DISTURB) ही सेवा अॅक्टीव्हेट करावी लागेल. तर जाणून घेऊया बीएसएनएल किंवा एमटीएनएल नंबरवर डू नॉट डिस्टर्ब (DND) सेवा कशी अॅक्टीव्हेट कराल?
डू नॉट डिस्टर्ब (DND) सेवा अॅक्टीव्हेट करण्याचे दोन मार्ग आहेत. 1. कॉल 2. एसएमएस. यातील दोन्हीही मार्ग अगदी सोपे आहेत. या पद्धतीने तुम्ही अगदी थोड्याच वेळात 'डू नॉट डिस्टर्ब' (DND) सेवा अॅक्टीव्हेट करु शकता.
कॉल किंवा SMS च्या माध्यमातून अॅक्टीव्हेट अशी करा DND सेवा:
1. START 0 लिहून 1909 वर पाठवा. असे केल्याने तुमच्या नंबरवर 'डू नॉट डिस्टर्ब' (DND) सेवा अॅक्टीव्हेट केली जाईल. यासाठी तुम्हाला 5-7 मिनिटे खर्च करावे लागतील.
2. याशिवाय तुम्ही 1909 या नंबरवर कॉल करुन दिलेल्या सुचनांचे पालन करा. असे केल्याने बीएसएनएल किंवा एमटीएनएल नंबरवर ही सेवा सुरु होईल.
तुम्ही देखील टेलीमार्केटिंग कॉल्सने त्रस्त असाल तर अशा प्रकारे फोनवर DND सेवा अॅक्टीव्हेट करा.