Google Play Store | (Photo Credits: File Photo)

Play Store च्या माध्यमातून तब्बल 20 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केलेली 13 अॅप्स Google ने हटवली आहेत. Google Play Store वरुन हटविण्यात आलेली ही अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये तर नाहीत ना? याची खात्री करा. ती तुमच्या मोबाईलमध्ये नसतील तर चांगलेच आहे. परंतू जर ती असतील तर ती तातडीने हटवा आणि आपला फोन सुरक्षीत करा. जाणून घ्या कोणकोणती अॅप्स गूगल प्ले स्टोरने हटवली आहेत. आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनमध्ये विविध अॅप्स डाऊनलोड करण्याचा महत्त्वाचा पर्याय म्हणजे Google Play Store. गूगल प्ले स्टोअर वापरुन आपल्याकडे जवळपास प्रत्येक जणच आपल्याला हवे ते अॅप डाऊनलोड करतो. पण, हे करत असताना अनेकदा आपल्यासोबत धोका होतो. काही दिशाभूल करणारी, खोटी अथवा हॅकर्सकडून पेरलेली आणि आपली खासगी माहिती चोरणारी अॅप डाऊनलोड होतात. अर्थात हे सर्व आपल्या नकळत होते. असे असले तरी गुगल प्ले स्टोर यावर बारीक लक्ष ठेऊन असतो. ज्यामुळे अशा अॅपवर तातडीने कारवाई केली जाते. आताही गूगल प्ले स्टोरने अशीच कारवाई केली आहे.

Google Play Store वरुन हटविण्यात आलेल्या App बद्दल प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या पडताळणीत ही अॅप्स दुर्भावनापूर्ण क्रियाकलाप करताना आढळून आली. असेही आढळून आले की, ही अॅप मोबाईलची बॅटरी अधिक प्रमाणात वापरतात, युजर्सचा मोबाईल डेटा मोठ्या प्रमाणावर वापरतात. शिवाय, युजर्सची खासगी माहितीही मिळवातत. असेही आढळून आले की, सदर अ‍ॅप्समध्ये फ्लॅशलाइट (टॉर्च), क्यूआर रीडर, कॅमेरा, युनिट कन्व्हर्टर आणि टास्क मॅनेजर यांचा समावेश होता. ज्यामुळे हे अॅप उघडताच गुप्तपणे अतिरिक्त कोड डाउनलोड जात असत. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे गूगलच्या लक्षात आले.

Google Play Store वरुन हटवलेली हीच ती 13 App's

  • High Speed Camera
  • SmartTask
  • Flashlight+
  • Memo calendar
  • English-Korean Dictionary
  • BusanBus
  • Quick Notes
  • ​Smart Currency Converter
  • ​Joycode
  • EzDica
  • ​Instagram Profile Downloader
  • ​Ez Notes
  • Image Vault - Hide Images

दरम्यान, Google Play Store वरुन हटविण्यात आली असली तरी ही अॅप्स नागरिकांच्या मोबाईलमध्ये अद्यापही कायम आहेत. होणारी फसवणूक आणि जोखीम टाळण्यासाठी संबंधित युजर्सनी ही अॅप तातडीने आपल्या मोबाईलमधून हटवणे आवश्यक असल्याचे अवाहन केले जात आहे.