ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी Mobiles Bonanza Sale सादर करत आहे. हा सेल 17 फेब्रुवारी पासून सुरु होत असून 21 फेब्रुवारीपर्यत असेल. या सेलअंतर्गत तुम्हाला अनेक स्मार्टफोन्स वर डिस्काऊंट मिळेल. वेबसाईटवरील माहितीनुसार, तुम्ही प्रत्येक दिवशी एका नव्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या सेल मध्ये तुम्ही सॅमसंग, अॅपल या कंपनीचे डिव्हाईस अत्यंत माफक किंमतीत खरेदी करू शकता. जाणून घेऊया Flipkart Mobile Bonanza सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल:
Flipkart Mobile Bonanza सेलमध्ये तुम्ही ICICI Bank च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन 10% इंस्टट डिस्काऊंट मिळेल. त्याचबरोबर या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर नो कॉस्ट इएमआय ऑप्शन आणि एक्सचेंज ऑफरची सुविधा देखील देण्यात येणार आहे. या ऑफर्सचा लाभ घेत ग्राहक अत्यंत कमी किंमतीत नवाकोरा स्मार्टफोन खरेदी करु शकतात. याशिवाय यात Axis Bank Buzz क्रेडिट कार्डवर 5% पर्यंत एक्स्ट्रा ऑफ दिले जाईल.
Samsung Galaxy A50:
Flipkart Mobile Bonanza सेलमध्ये Samsung Galaxy A50 स्मार्टफोन तुम्ही केवळ 12,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. फोनमध्ये 25MP + 5MP + 8MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 25MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी त्यात 4,000 एमएएच ची बॅटरी देखील देण्यात आली आहे.
iphone xs:
त्याचबरोबर iphone xs वर देखील जबरदस्त डिस्काऊंट ऑफर देण्यात येत आहे. या स्मार्टफोनचा
64 जीबी स्टोरेज मॉडेल तुम्ही केवळ 59,999 रुपयांना खरेदी करु शकता. यात नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन आहे आणि 9,167 रुपयांच्या ईएमआय मध्ये तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. यात 12MP + 12MP चा ड्युल रिअर कॅमेरा आणि 7MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
Redmi Note 7 Pro:
याशिवाय Redmi Note 7 Pro या फोनवर देखील Flipkart Mobile Bonanza सेल अंतर्गत आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. या फोनची किंमत 15,999 रुपये असून या सेलमध्ये तुम्ही हा फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकाल. याशिवाय यात एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे.
Realme XT:
Realme XT घेण्याचा विचार करत असाल तर हा सेल म्हणजे एक उत्तम संधी आहे. Flipkart Mobile Bonanza सेल मध्ये हा फोन 14,999 रुपयांना मिळेल. या स्मार्टफोनची मूळ किंमत 16,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे.
हा सेल 21 फेब्रुवारीपर्यंत असल्याने लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या.