Flipkart च्या फ्लॅगशिप फेस्ट सेलला सुरुवात, iPhone 12 सह 'हे' स्मार्टफोन स्वतात खरेदी करण्याची संधी
Flipkart (Photo Credits: File Photo)

ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart च्या शानदार फेस्ट सेलला सुरुवात झाली आहे. या शानदार सेलमध्ये जवळजवळ सर्व ब्रँन्डच्या स्मार्टफोनवर आकर्षक डील आणि ऑफर मिळणार आहे. त्याचसोबत सिटी बँककेडून क्रेडिट आणि डेबिट कार्ड होल्डर्सवर 10 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना डिवाइसवर 2500 रुपयांच्या सुरुवातीला नो-कॉस्ट ईएमआय मिळणार आहे. तर Realme X50 Pro 5G ची किंमत 24,999 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 6.44 इंचाचा ड्युल पंच होल डिस्प्ले दिला गेला आहे. फोनमध्ये सॅमसंगच्या Super AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. याची स्क्रिन-टू-बॉडी रेश्यो 92 टक्के आहे. फोनच्या परऑर्मेन्ससाठी यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसरचा वापर केला आहे. फोन 12GB RAM LPDDR 4 सपोर्टसह येणार आहे.

सेलमध्ये iPhone XR स्मार्टफोन 36,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याच्या स्क्रिनचे रेज्यॉल्यूशन 1792X828 पिक्सल आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये Apple 12 बायोनिक प्रोसेसर दिला गेला आहे. जो न्यूरल इंजिन वर काम करणार आहे. तसेच प्रोसेसिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढवतो. फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा f/1.8 अपर्चरसह येणार आहे. तसेच 4K व्हिडिओ शूट करता येणार आहे. सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 7 मेगापिक्सलचा टू डेप्थ सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.(जबरदस्त स्मार्टफोन Redmi Note 10S भारतात 'या' दिवशी होणार लॉन्च, स्पेसिफिकेशन्स लीक)

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये iPhone 11 हा 48,999 रुपयांना तुम्ही विकत घेऊ शकता. यामध्ये Apple च्या नव्या A13 बायोनिक चिपचा वापर केला आहे. जी लेटेस्ट iOS 13 ऑपरेटिंग सिस्टिमसह लॉन्च केली आहे. iPhone11 च्या कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला गेला आहे. तसेच 12 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह 12 मेगापिक्सलचा सेकेंडरी अल्ट्रा वाइड सेंसर दिला गेला आहे. यामध्ये f/2.4 च्या अपर्चर असणारा सेंसरचा वापर केला आहे. ज्याचा फिल्ड ऑफ व्यू 120 डिग्री दिला गेला आहे. फोनच्या रियर कॅमेऱ्यामध्ये Smart HDR, इंप्रुव्ह नाइट मोड, इन्हांस्ड प्रोट्रेट मोड आणि 60fps सह 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा मिळणार आहे.

LG Wing या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये आहे. यामध्ये 6.8 इंचाचा FHD+pOLED मेन डिस्प्ले दिला जाणार आहे. जो 1080 पिक्सल रेज्यॉल्यूशन सपोर्टसह येणार आहे. मुख्य डिस्प्ले नेहमीच ऑन आणि गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येणार आहे. तर 3.9 इंचाचा gOLED सेकेंड्री डिस्प्ले मिळणार आहे. प्रोसेसरच्या आधारावर LG Wing स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 765 चे सपोर्ट दिला जाणार आहे.